वाळू शिल्पातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:04 PM2019-01-22T14:04:08+5:302019-01-22T14:10:19+5:30

मालवण : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमांतंर्गत मालवणातील विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारी वाळू शिल्पे रेखाटली. केंद्रप्रमुख अनिल खडपकर ...

Save the daughter from Shilpa, daughter slogan! | वाळू शिल्पातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा!

वाळू शिल्पातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा!

Next
ठळक मुद्देवाळू शिल्पातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा!मालवण केंद्रांतर्गत स्पर्धा: चिवला बीच किनारी साकारली ४५ वाळूशिल्पे

मालवण : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमांतंर्गत मालवणातील विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारी वाळू शिल्पे रेखाटली. केंद्रप्रमुख अनिल खडपकर यांच्या संकल्पनेतून मालवण केंद्रातील शाळांसाठी वाळूशिल्प स्पर्धा घेण्यात आली. यात विशेष म्हणजे शिक्षकांनीही वाळूशिल्प रेखाटत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देण्यात आला.

मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती गणेश कुशे यांच्या हस्ते स्पधेर्चे उद्घाटन झाले. सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मुख्याधिकारी रंजना गगे, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक आप्पा लुडबे, सेजल परब, दर्शना कासवकर, मंदार केणी, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, सर्व शिक्षा अभियानच्या विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर, आरती कांबळी, मेघना जोशी, नंदिनी साटलकर, टोपिवाला हायस्कुल मुख्याध्यापक मिलिंद अवसरे अशा विविध मान्यवरांनी वाळुशिल्प स्पधेर्ला भेट देऊन कौतुक केले.

विद्यार्थी व शिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन सुमारे ४५ वाळुशिल्प किना?्यावर साकारली. वाळुशिल्प बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रुपेश नेवगी व बलराम सामंत यांनी केले. चिवला बीचवर प्रथमच घेण्यात आलेल्या या वाळूशिल्प स्पर्धेत मालवणातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविल्याने ही स्पर्धा रंगली.

स्पर्धेत कुडाळकर प्राथमिक शाळा मालवण, कन्याशाळा मालवण, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कुल, टोपीवाला हायस्कुल मालवण, जय गणेश शिक्षक गट मालवण यांनी विविध गटांतर्गत प्रथम क्रमांक पटकाविले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, केद्रप्रमुख अनिल खडपकर, यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन मनिषा ठाकुर तर आभार शिवराज सावंत यांनी मानले.

Web Title: Save the daughter from Shilpa, daughter slogan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.