रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात सावंतवाडी पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा सावंत यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:17 PM2019-04-26T17:17:29+5:302019-04-26T17:19:31+5:30
कोकण रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा सिंधुदुर्ग कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने डी के सावंत यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृह प्रवासी संघटनेची बैठक आयोजित करून यावरचा निर्णय घेण्यात येणार असेही सावंत यांनी सांगितले.
सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा सिंधुदुर्गकोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने डी के सावंत यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृह प्रवासी संघटनेची बैठक आयोजित करून यावरचा निर्णय घेण्यात येणार असेही सावंत यांनी सांगितले.
ते म्हणाले कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून २२ वर्षे झाली आहे. मात्र येथील प्रवाशांच्या आणि चाकरमान्यांच्या नाराजी आहे. प्रवाशांची ससेहोलपट होत आहे. कोकण रेल्वे असताना अत्यंत वाईट पद्धतीने मेंढरासारखे प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे विविध मागण्या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे मांडण्यात आल्या होत्या.
परंतु या मागण्यांची पूर्तता अद्याप पर्यंत झालेले नाही त्यामुळे आता आंदोलन निश्चित आहे. याबाबत पुढील ध्येयधोरण ठरवण्यासाठी ३० तारखेच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच त्या बैठकीला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.