सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा! राज्यासह गोवा,कर्नाटकातील स्पर्धकांचा सहभाग, राजू पनवेलकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 01:32 PM2017-12-17T13:32:41+5:302017-12-17T13:54:35+5:30

कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला.

Sawantwadi to compete in the competition of fish! Raju Panvelkar won the participants in Goa, Karnataka along with the state | सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा! राज्यासह गोवा,कर्नाटकातील स्पर्धकांचा सहभाग, राजू पनवेलकर विजयी

सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा! राज्यासह गोवा,कर्नाटकातील स्पर्धकांचा सहभाग, राजू पनवेलकर विजयी

Next

- अनंत जाधव
सावंतवाडी - कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. रविवारी सकाळी ८ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली ती ११ वाजेपर्यंत चालली. स्पर्धा बघण्यासाठी मोती तलावाच्या काठावर मोठी गर्दी झाली होती. या स्पर्धेत सावंतवाडीचे राजू पनवेलकर यांनी एकूण ४१७ सेंटीमीटरचे १४ मासे पकडत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधत पालिकेने मोती तलावाच्या काठावर राज्यस्तरीय मासे पकडण्याची स्पर्धा आयाजित केली होती. प्रथम महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या स्पर्धेत गोवा व कर्नाटक राज्यातील काही स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल ५६ स्पर्धकांनी आपली नावे नोंदवली. त्यानंतर त्यांना मोती तलावाच्या काठावर प्रत्येक चौकोन आखून देण्यात आला. तेथे त्यांनी मासे पकडावेत अशी अटक घातली. त्यानुसार मासे पकडणे सुरू झाले.
प्रत्येक स्पर्धक पकडलेला मासा परीक्षकांना दाखवत असे व जिवंत पुन्हा तलावात सोडत होता. यावर प्रत्येकाचे गुणांकन ठरले होते. ११ वाजता स्पर्धा संपल्यानंतर विजेत्यांची नावे परीक्षकांनी घोषित केली. यात ४१७ सेंटीमीटरचे १४ मासे पकडत सावंतवाडीतील राजू पनवेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर रामा वडार यांनी ३७५ सेंटीमीटरचे १२ मासे पकडले. त्यांना व्दितीय क्रमांक  देण्यात आला. तृतीय क्रमांक अ‍ॅशर लोबो यांनी पटकावला. त्यांनी ३३५ सेंटीमीटरचे १० मासे पकडले. विजेत्यांना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, सुधीर आडिवरेकर, अ‍ॅड. परिमल नाईक यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, दीपाली सावंत, भारती मोरे, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, समृध्दी विरनोडकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर आदि उपस्थित होते.

Web Title: Sawantwadi to compete in the competition of fish! Raju Panvelkar won the participants in Goa, Karnataka along with the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.