वनमहोत्सवापासून ‘सावंतवाडी’ अलिप्त

By admin | Published: June 30, 2016 10:11 PM2016-06-30T22:11:11+5:302016-06-30T23:56:59+5:30

बबन साळगावकर : पालिका लावणार केवळ एक झाड; दोन कोटी वृक्षारोपण दिखाऊपणाच

Sawantwadi detached from Vanamahotsav | वनमहोत्सवापासून ‘सावंतवाडी’ अलिप्त

वनमहोत्सवापासून ‘सावंतवाडी’ अलिप्त

Next

सावंतवाडी : शासनाचा वनमहोत्सव केवळ दिखाऊपणा असून, दोन कोटी झाडे जगविण्यासाठी पाणी कोठून आणणार? असा सवाल उपस्थित करीत आज, १ जुलैला होणाऱ्या वनमहोत्सवात सावंतवाडी नगरपरिषद सहभागी होणार नाही, तर फक्त एक झाड लावणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेविका शुभांगी सुकी, अफरोज राजगुरू, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, क्षिप्रा सावंत, वैशाली पटेकर, नगरसेवक संजय पेडणेकर, विलास जाधव, देवेंद्र टेमकर, आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेतर्फे यंदाही दहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी ३५०० झाडे लावण्याचे काम शहरात सुरू आहे. यामध्ये प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक, १६ कर्मचारी मिळून पाच जातींचे वृक्ष शहरातील नागरिकांच्या परिसरात जाऊन लावणार आहेत व त्यांची निगा राखणार आहेत. हा उपक्रम अत्यंत शांततेत चालू असून, दिखाऊपणा केला जात नाही.
मात्र, शासनाचे दोन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आपणास मान्य नाही. राज्यात काही भागात आधीच दुष्काळी परिसर असताना झाडे जगणार कशी? दोन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार? नुसता दिखाऊपणा करण्यासाठी झाडे लावण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)


शहरातील पार्किंग समस्येबाबत
९ जुलैला सायंकाळी चार वाजता सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्यासमवेत वाहतूक पोलिस, व्यापारी, पत्रकार, रिक्षा संघटनेची बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करणार आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष


...तर ठेकेदार काळ्या यादीत
सावंतवाडी मोती तलावाकाठचे
फूटपाथचे काम गेले कित्येक महिने रखडले असून, ठरावीक कालावधीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारालाही काळ्या यादीत टाकू, असा इशारा नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिला.

Web Title: Sawantwadi detached from Vanamahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.