सावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 05:38 PM2019-12-07T17:38:37+5:302019-12-07T17:41:46+5:30

कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला आहे. यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.

Sawantwadi Municipality by election Rebellion in BJP | सावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: भाजपमध्ये बंडखोरी अटळ

सावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: भाजपमध्ये बंडखोरी अटळ

googlenewsNext

सिंधुदुर्ग: भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला आहे. यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. कोरगावकर यांनी अपक्ष व भाजप असे दोन अर्ज दाखल केले. हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषांत खांडेकर यांच्याकडे दाखल केले आहेत.

बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक आहे. भाजपकडून सात ते आठ उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची असलेली गर्दी पाहून जठार यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचा विचार हा वरिष्ठ पातळीवर होईल, असे जाहीर केले आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आठ तारीखपर्यंत थांबावे लागणार आहे. तर अद्यापपर्यंत कोणीही अर्ज भरला नव्हता. मात्र सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व सध्याच्या प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पहिल्यापासूनच भाजपा कडून किंवा अपक्ष असे निवडणूक रिंगणात उतरण्याची जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी सुषांत खांडेकर यांच्याकडे दाखल केला. पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तसेच पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असेही कोरगावकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ झाली असून आता याचा निर्णय पक्षीयस्तरावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यापूर्वीही कोरगावकर यांनी नगरसेवकपदासाठी भाजपमधून अर्ज दाखल केला होता, मात्र, आयत्यावेळी त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणू निवडणूक लढवून त्या निवडून आल्या होत्या. तसेच मागील तीन वर्षाचे सावंतवाडी नगरपालिका उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या.

Web Title: Sawantwadi Municipality by election Rebellion in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.