सावंतवाडी: आमदार केसरकराच्या बैठकीतील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; टेस्टनंतरही कामकाजात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 03:50 PM2022-01-15T15:50:14+5:302022-01-15T15:51:03+5:30
नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने चार दिवसापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट दिली होती.
सावंतवाडी : एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असताना सर्वत्र कडक निर्बंध लादले जात आहेत मात्र दुसरीकडे नगरपालिकेचा दिखावापणा उघड झाला असून जे नियम बनवतात तेच आता कोरोनाला हलक्यात घेऊ लागलेत की काय असा प्रश्न एका निष्काळजीपणा दाखवून अनेकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे उपस्थित होऊ लागला आहे.
नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने चार दिवसापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट दिली होती त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी आला. यात हा अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले खरे पण तत्पूर्वी हा अधिकारी सकाळीच आमदार दिपक केसरकर यांच्या तहसीलदार कार्यालयांतील बैठकीसह तसेच शहरातील वेगवेगळ्या नागरिकांमध्ये फिरत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे कोरोना फक्त नागरिकांसाठीच आहे की काय असा आता सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
सावंतवाडी नगरपालिकेने कोरोना बाबत कडक नियमावली अवलंबली आहे चक्क मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी तर त्यांना भेटायला येणाऱ्याचा कोरोना अहवाल बघितल्याशिवाय भेट देणार नाही अशी भूमिका घेत चक्क फलकही लावले आहेत तसेच शहरातील नागरिकांकडून ही कोरोना नियम पाळले जावेत यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही ही आखण्यात आल्या आहेत मात्र नागरिकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करत असताना मात्र नगरपालिकेत कोरोना नियम धाब्यावर बसवत असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.
कारण नगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला थोडासा त्रास होऊ लागल्याने आरटीपीसीआर टेस्ट केली होती.ही टेस्ट केल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कोणत्याही शासकीय कामात सहभागी होता कामा नये होते पण हा अधिकारी नागरिकांसह पालिकेच्या कामकाजात ही सहभागी झाला होता त्यातच शुक्रवारी सकाळी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जी तहसिलदार कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीत ही हा अधिकारी सहभागी झाला या बैठकीत आमदार केसरकर यांच्या समवेत अनेक वरिष्ठ अधिकारी ही उपस्थितीत होते.त्यानंतर सायंकाळी उशिरा या अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मात्र सगळ्यात खळबळ माजली आहे.
त्यामुळे नगरपालिकेचा कोरोना मधील फोलपणा ही उघड झाला आहे.एरव्ही सामान्य नागरिकांना कोरोना बाबत अनेकांना नियम शिकवणारे स्वता मात्र कोरोना ला हलक्यात घेऊन इतराचा जीव कसा धोक्यात घालत आहेत यातून दिसून येत आहे.