सावंतवाडीत लवकरच पर्यटन महोत्सव होणार - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 04:30 PM2024-02-11T16:30:11+5:302024-02-11T16:32:09+5:30

या उद्घाटनाचे औचित्य साधून हा महोत्सव घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

Sawantwadi will soon have a tourism festival - Deepak Kesarkar | सावंतवाडीत लवकरच पर्यटन महोत्सव होणार - दीपक केसरकर

सावंतवाडीत लवकरच पर्यटन महोत्सव होणार - दीपक केसरकर

सावंतवाडी : सावंतवाडी शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसित झाले पाहिजे अधिकचे पर्यटक या जिल्ह्यात आले पाहिजेत यासाठी पुढील काळात सावंतवाडी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे तसेच तलावात  तलावात म्युझिकल फाऊंटन बसविण्यासाठी साडे चार कोटीचा निधी दिला आहे. या उद्घाटनाचे औचित्य साधून हा महोत्सव घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित  महासंस्कृती महोत्सवाचा समारोप शनिवारी रात्री उशिरा पार पडला या  कार्यक्रमात ते बोलत होते.दरम्यान सावंतवाडी महोत्सव कार्यक्रमासाठी गायक अवधूत गुप्ते यांनी उपस्थित रहावे, त्याच्या गाण्याच्या तालावर कारंजा सुरू करूया, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपजिल्हाधिकारी मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय दंडाधिकारी म्हस्के पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, तहसीलदार श्रीधर पाटील, अमित कामत उपस्थित होते.

सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकासात अग्रेसर होत असतना या शहरात पर्यटक यावेत यासाठी संगीत म्युझिकल फाऊंटन उभा करण्यात येणार आहे.हा संगीत कारंजा असून हे बघण्यासाठी जास्तीचे पर्यटक येतील असे मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.तसेच यावेळी मंत्री केसरकर यांनी गायक अवधूत गुप्ते याच्या गाण्याचा आनंद ही लूटला.

Web Title: Sawantwadi will soon have a tourism festival - Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.