सावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:39 PM2019-12-28T15:39:27+5:302019-12-28T15:41:01+5:30

माझ्यावर टीका करून दीपक केसरकर यांना विकास साधायचा असेल तर त्याला माझी हरकत नाही. पण असे करून सावंतवाडीवासीयांचे भले होणार नाही. मी येथे निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, तुम्ही माझा नगराध्यक्ष द्या, पुढील दीड वर्षात सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

Sawantwadi will transform in a year and a half: Rane | सावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणे

सावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणे

Next
ठळक मुद्देसावंतवाडीचा दीड वर्षात कायापालट करणार : नारायण राणेसावंतवाडीत राणे यांची पत्रकार परिषद

सावंतवाडी : माझ्यावर टीका करून दीपक केसरकर यांना विकास साधायचा असेल तर त्याला माझी हरकत नाही. पण असे करून सावंतवाडीवासीयांचे भले होणार नाही. मी येथे निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, तुम्ही माझा नगराध्यक्ष द्या, पुढील दीड वर्षात सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. मायनिंगच्या पैशावर घर चालवणाऱ्यांनी आमच्यावर खंडणीचे आरोप करू नयेत, असा टोलाही राणे यांनी यावेळी केसरकर यांचे नाव न घेता लगावला.

निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपल्यानंतर राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आमदार नीतेश राणे, राजन तेली, संजू परब, अतुल काळसेकर, रेश्मा सावंत, संदीप कुडतरकर, राजू राऊळ उपस्थित होते.

राणे म्हणाले, मी जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले. पण ते प्रकल्प बंद पाडण्याचे काम माजी पालकमंत्र्यांनी केले आहे. ज्या व्यक्तीला विकास कसा असतो हेच माहीत नाही, त्याच्याबद्दल काय बोलायचे? नगरपालिका निवडणुकीत विकासाबद्दल चर्चा झाली नाही.

फक्त राणेंवर टीका हा एकमेव अजेंडा घेऊन केसरकर हे निवडणुकीत उतरत असतात. पण यातून शहराचे भले होणार नाही. सावंतवाडीतील एकही प्रकल्प सुरू नाही. सर्व प्रकल्प बंद आहेत. मग विकास कसा म्हणायचा, असा सवाल राणे यांनी केला आहे.

मी निधी दिला नाही असे जर केसरकर सांगत असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बघावे. जनतेची दिशाभूल करणे सोपे असते. पण जे सत्य असते ते नाकारू शकत नाही, असेही राणे म्हणाले. माझा उमेदवार काम करणारा आहे. मला फक्त पुढील दीड वर्ष द्या. मी सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो. मोती तलावाचा विकास म्हणजे सावंतवाडीचा विकास समजू नका. येथे अनेक प्रकल्प करण्यासारखे आहेत, असे राणे यांनी सांगितले.

शिवसेनेचे पदाधिकारी खंडणी मागतात

शिवसेनेचे पदाधिकारी खंडणी मागतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शुक्रवारी रोखण्यात आलेले डंपर. मात्र, हे डंपर शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्याने रोखले ते खंडणीसाठीच काय? असा सवाल करत खंडणीचे पैसे घेऊ नका असे मतदारांना सांगता, मग खंडणी कोण मागतो हे पहिले ठरवा, अशी टीका राणे यांनी केली.

Web Title: Sawantwadi will transform in a year and a half: Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.