सावडाव धबधबा याही वर्षी पर्यटनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 03:15 PM2021-06-12T15:15:29+5:302021-06-12T15:17:19+5:30
Tourism CoronaVirus Sindhudurg : गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.
कनेडी : गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.
गेली आठ वर्षे वर्षा पर्यटनासाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटकांना सावडाव धबधब्याने भुरळ घतल्यानतंर पर्यटक गर्दी करत असून गतवर्षी कोरानाचे सावट असल्याने धबाधबा बंद करण्यात आला होता. त्यामुळे गर्दी दिसली नाही. मात्र गेले एक वर्षे सोडले तर दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक सावडाव धबधब्यावर येत वर्षा पर्यटनांचा आनंद घेत असतात. मात्र यंदाही कोरोना संकटामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडणार असून याचा फटका येथील रोजगार मिळालेल्या चार ते पाच व्यावसायिकांना होणार असून त्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या अभ्यंगत पर्यटन करालाही मुकावे लागणार आहे.
वर्षा पर्यटनांसाठी नागरीकांनी जीव धोक्यात घालून येवू नये, असे आवाहन सावडाव सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे ग्रामसेवक शशिकांत तांबे व ग्रामस्थांनी केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हात कोरोना रूग्णसंख्या जास्त आहे. त्याच अनुशंगाने विचार करता सावडाव धबधबा पर्यटन स्थळ शासनाच्या नियमानुसार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले .
अनिश्चित कालावधीसाठी बंद
जिल्हात कोरानाचे संकट लक्षात घेता यावर्षी सावडाव धबधबा कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरीक व पर्यटकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन तसेच राज्य, इतर राज्य व जिल्ह्यातील अनेक भागातून दरवर्षी येणा-या पर्यटकांची गर्दी पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मार्गही बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.