सर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 05:51 PM2021-06-06T17:51:20+5:302021-06-06T17:53:39+5:30

Wildlife Malvan Sindhudurg : सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली असलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरांची वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटका करत त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.

The scaly cats found at Surjekot were released into the natural habitat | सर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासात

सर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासात

Next
ठळक मुद्देसर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासातवनविभाग कर्मचाऱ्यांनी केली सुटका

मालवण : सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली असलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरांची वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटका करत त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.

सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर, नील आचरेकर ही लहान मुले खेळत होती. यावेळी त्यांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ प्राणीमित्र राजन आचरेकर यांच्या घरी जात त्यांना याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याचे दिसून आले.

स्थानिक ग्रामस्थांनी कुडाळ येथील वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना याची माहिती दिली. त्यानुसार येथील परिमंडळाचे वनपाल श्रीकृष्ण परीट, कांदळगाव येथील वनरक्षक सारीक फकीर, वनमजूर अनिल परब यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जाळ्यात अडकलेल्या त्या खवले मांजराची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांनी त्या खवले मांजराची तपासणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

यावेळी सरपंच नीलिमा परूळेकर, ग्रामपंचायत सदस्य भारती आडकर, गोरज आचरेकर, राजेश पराडकर, रोहन लाड, सुदेश रेवंडकर, जय लाड, स्नेहल आचरेकर, तन्वी पराडकर, किर्ती आचरेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे म्हणाले, वन्यप्राणी खवले मांजर ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून त्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 न्वये संरक्षण प्राप्त असून त्यास अनुसूचि 1 मध्ये वर्गीकृत केले आहे. ग्रामस्थांनी वेळीच वनविभागास माहिती दिल्याने वन्यप्राणी खवले मांजराचा जीव वाचला आहे. खर्‍या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन सार्थकी लावल्याबद्दल ग्रामस्थांचा आभारी आहे.

Web Title: The scaly cats found at Surjekot were released into the natural habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.