राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना शिष्यवृत्ती वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:33 PM2017-10-08T12:33:14+5:302017-10-08T12:35:20+5:30
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती वितरण तसेच जिल्ह्यातील शाळांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वितरण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना शिष्यवृत्तीचा धनादेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी दि.08 : राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती वितरण तसेच जिल्ह्यातील शाळांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वितरण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना शिष्यवृत्तीचा धनादेश व पुष्प देऊन गौरविण्यात आले.
प्रोत्साहनात्मक अनुदान सन 2016-17 14 वर्षाखालील - डॉन बास्को हायस्कुल ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग - प्रथम, मिलाग्रीस हायस्कुल सावंतवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग- व्दितीय, सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग - तृतीय.
प्रोत्साहनात्मक अनुदान सन 2016-17 17 वर्षाखालील - डॉन बास्को हायस्कुल ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग - प्रथम, सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग - व्दितीय. आंबोली पब्लिक स्कूल आंबोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग - तृतीय.
प्रोत्साहनात्मक अनुदान सन 2016-17 19 वर्षाखालील - कुडाळ हायस्कूल कुडाळ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग - प्रथम, श्रीम. एन.एस.पी. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड ता. देवगड जि. सिंधुदुर्ग - व्दितीय, राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग - तृतीय.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती सन 2016-17 खेळाडूचे नाव - दिप्ती दिगंबर परब खेळ - हॅण्डबॉल रक्कम - 3 हजार 750 रुपये. सेजल विकास सावंत - हॅण्डबॉल - रक्कम -3 हजार 750 रुपये. अक्षदा तुळशीदास गवस - हॅण्डबॉल रक्कम - 3 हजार 750 रुपये. पल्लवी बाळकृष्ण शिंदे- ज्युदो रक्कम - 6 हजार 750 रुपये. नेविस फिदलीस डॉटस - कॅरम रक्कम- 8 हजार 950 रुपये.
62 वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती - खेळाडूचे नाव - सोहम अजय शिंदे खेळ - सॉप्टबॉल प्राविण्य - व्दितीय रक्कम- 8 हजार 950 रुपये. श्रीपाद नंदकिशोर नाईक - सॉफ्टबॉल - व्दितीय - 8 हजार 950 रुपये. श्रीवल्लभ श्रीकृष्ण सावंत - रायफल शुटींग - व्दितीय - 8 हजार 950 रुपये. तनया रामचंद्र वाडकर - रायफल शुटींग - प्रथम - 11 हजार 250 रुपये.
61 वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती - राहूल रोहित परुळेकर - किक्रेट - 3 हजार 750 रुपये. वयोगटानसार शाळांना प्रथम - एक लाख रुपये, व्दितीय - 75 हजार रुपये तर तृतीय - 50 हजार रुपये या प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आले. प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडवेकर यांनी प्रास्ताविकात प्रोत्साहनपर अनुदानाची माहिती दिली.