लोकसभा की विधानसभा?, मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Published: November 11, 2023 04:32 PM2023-11-11T16:32:47+5:302023-11-11T16:34:52+5:30

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले ते खरे नाही आम्ही काही ग्रामपंचायत ...

School Education Minister Deepak Kesarkar announced that he will contest the assembly elections | लोकसभा की विधानसभा?, मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा की विधानसभा?, मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले ते खरे नाही आम्ही काही ग्रामपंचायत या युतीमधून लढवल्या होत्या. त्यामुळे एकही ग्रामपंचायत नाही म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार असा ही प्रचार झाला, पण काहीच्या मनातील हा गोड गैरसमज दूर होण्यासाठीच मी २०२४ ची विधानसभाच लढविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. ते आज, शनिवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार संघातील बरीच विकास कामे पूर्ण झाल्याचा दावाही ही केला.

मंत्री केसरकर म्हणाले, राज्याच्या शिक्षणविभागात केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरण समोर बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखांहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात 61 हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा..

मराठा समाज बांधवांना टीकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाशी चर्चा करूनच काही निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मराठा समाज बांधवाना आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारे असावे असेही त्यांनी सांगितले. मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

खासदारकीच्या उमेदवाराला 50 हजाराचे लीड मिळून देणार 

सावंतवाडी मतदारसंघांमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही असा प्रचार करणे चुकीचे आहे. दुसरीकडे मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार असा प्रचारही काही कडून करण्यात येत आहे. मात्र काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी 2024 मध्ये आमदारकीच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला 50 हजारचे लीड मिळून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्या निवृत्त शिक्षकांना मानधन मिळणार..

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता निवृत्त शिक्षकांना तात्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: School Education Minister Deepak Kesarkar announced that he will contest the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.