आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी

By अनंत खं.जाधव | Published: July 10, 2023 05:56 PM2023-07-10T17:56:18+5:302023-07-10T17:58:54+5:30

या कामाला तब्बल 31 कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला

School Education Minister Deepak Kesarkar inspected the site for International School at Amboli Gele | आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी

आंबोलीत आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी हालचाली, मंत्री केसरकरांकडून जागेची पाहणी

googlenewsNext

सावंतवाडी : आंबोली गेळे येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय स्कूल उभे करण्यात येणार आहे. या स्कूलच्या जागेची पाहणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत केली. अजून एक दोन जागा बघितल्यानंतर जागेचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, आंबोली सरपंच सारीका पालयेकर, संतोष पालयेकर, विलास गावडे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे आदी उपस्थित होते.

लोणावळा, पाचगणीच्या धरतीवर आंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूल उभे करण्याचा मंत्री केसरकर यांचा मानस आहे. याठिकाणी निवास व्यवस्था ही करण्यात येणार आहे. या कामाला तब्बल 31 कोटीचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

शाळेचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे या दृष्टीने मंत्री केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत गेळे येथील जागेची पाहणी केली. मात्र गेळे येथील जागेवर अद्याप पर्यंत एकमत झाले नाही. त्यामुळे आणखी दोन ते तीन जागेची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना पाहाणी करण्यास सांगण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर जागेबाबत निश्चिता होईल असे केसरकर यांनी सांगितले. दरम्यान मंत्री केसरकर यांचा गेळे येथील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुलांना ही केसरकर यांच्या हस्ते पुस्तके देण्यात आली.

Web Title: School Education Minister Deepak Kesarkar inspected the site for International School at Amboli Gele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.