शाळकरी विद्यार्थी समुद्रात बेपत्ता

By admin | Published: February 14, 2016 12:50 AM2016-02-14T00:50:32+5:302016-02-14T00:50:32+5:30

मांडवी किनाऱ्यावर गेला होता पार्टीसाठी

School students missing in sea | शाळकरी विद्यार्थी समुद्रात बेपत्ता

शाळकरी विद्यार्थी समुद्रात बेपत्ता

Next

रत्नागिरी : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेला संकेत अनंत खानविलकर (१४ वर्षे, मारुती मंदिर, रत्नागिरी) हा विद्यार्थी शहरानजीकच्या मांडवी किनाऱ्यावर समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास घडली. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
समुद्रात बुडालेला विद्यार्थी संकेत हा शहरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता नववी वर्गामध्ये शिकत होता. शनिवारी दुपारी १ ते २ या वेळेत नववीचा घटक चाचणी परीक्षेचा भूगोलचा शेवटचा पेपर देऊन तो आपल्या मित्रांसह शाळेतून बाहेर पडला. त्याचा वर्गमित्र दीपक सुरेश झोरे याचा शुक्रवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाची पार्टी करण्याचे मित्रांनी ठरविले. त्याप्रमाणे संकेत बरोबर निखिल विनय कांबळे, दीपक झोरे, ऋषिकेश राजेश शेलार आणि अक्षय कृष्णा वरक हे आठवडा बाजारातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे पार्टीनिमित्त त्या पाचहीजणांनी चायनीजवर ताव मारला. हॉटेलमध्ये चायनीज खाल्ल्यावर ते सर्वजण मांडवी किनाऱ्यावरील घुडेवठार येथे समुद्रकिनारी गेले. तेथे बराच वेळ मौजमजा केल्यानंतर संकेत एकटाच समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर अन्य दोन मित्रही पाण्यात गेले. संकेत पोहत असतानाच अचानक लाट आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. त्यावेळी दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओहोटी असल्याने लाटेच्या पाण्याबरोबर तो खोल पाण्यात जावून बुडाल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांना रडू कोसळले. त्यांनी आरडाओरडा केला. घटना घडली त्यावेळी पाच मित्रांच्या व्यतिरिक्त तेथे अन्य कोणीही नव्हते. संकेत बुडाल्याची माहिती समजताच तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, शहर पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी, पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक, भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आदींनी मांडवी किनाऱ्यावर घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरा रत्नागिरी पं.स.चे सभापती बाबू म्हाप यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. संकेत हा आपल्या आजी-आजोबांकडे राहात होता. त्याची आई मुंबईत असते. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. (शहर वार्ताहर)

Web Title: School students missing in sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.