सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
By अनंत खं.जाधव | Published: July 7, 2024 10:07 PM2024-07-07T22:07:58+5:302024-07-07T22:09:32+5:30
आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने मंत्री केसरकर यांनी स्वत: पुढाकार घेत एक दिवसाची सुट्टी केली जाहीर
सावंतवाडी: रविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याने प्राथमिक शाळांना सोमवारी 8 जुलैला एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली असून तशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभर मोठ्याप्रमाणात पाऊस कोसळत आहे. आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी स्वत: पुढाकार घेत एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तसे आदेश काढण्याची सुचना ही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.