सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:21 PM2017-07-18T13:21:14+5:302017-07-18T13:21:14+5:30

प्रदर्शनाचे उदघाटन रिमोटव्दारे, विद्यार्थ्यांनी घेतला प्रदर्शनाचा लाभ

Science Express helps in understanding the environment: Suresh Prabhu | सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू

सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू

Next


आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. १७ : आज आपल्या देशात किंबहुना सर्व जगातच पर्यावरण विषयक समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पर्यावरणा बाबत जनमानसात जागृती व्हावी विशेषत: विद्यार्थी-विद्याथीर्नींच्यात पर्यावरणाबाबत जागृती व्हावी यासाठी सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचा उपक्रम रेल्वे मंत्रालयाने विविध विभागाच्या सहकार्याने सुरु केला आहे. विद्यार्थ्यांच्यात पर्यावरणाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यासाठी सायन्स एक्सप्रेस प्रदर्शन निश्चित उपयुक्त होईल असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आलेल्या सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचे उदघाटन रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी रिमोटव्दारे केले, यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कोकण विभागाचे रेल्वे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रंगराव काळे, रानबांबुळी सरपंच संध्या परब, रानबांबुळी उपसरपंच संजय लाड, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, प्रभाकर सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सायन्स एक्सप्रेस प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: Science Express helps in understanding the environment: Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.