सिंधुदुर्ग स्टेशनवर १७ जुलै रोजी सायन्स एक्सप्रेस

By admin | Published: July 15, 2017 03:49 PM2017-07-15T15:49:59+5:302017-07-15T15:49:59+5:30

भारतातील समृध्द जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन

Science Express on Sindhudurg station on 17th July | सिंधुदुर्ग स्टेशनवर १७ जुलै रोजी सायन्स एक्सप्रेस

सिंधुदुर्ग स्टेशनवर १७ जुलै रोजी सायन्स एक्सप्रेस

Next


आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. १५ : सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथे १७ जुलै २0१७ रोजी सकाळी १0 वाजता सायन्स एक्सप्रेस येत आहे. ही रेल्वे या स्थानकावर सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. या रेल्वेतील प्रदर्शन कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सायन्स एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (डीएसटी) विशेष प्रकल्प आहे. ही १६ डब्यांची वातानुकूलित प्रदर्शनी ट्रेन आॅक्टोबर २00७ पासून भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत १ लाख ५६ हजार किमीचा प्रवास पूर्ण करणा-या या गाडीने आठ वेळा देशाचा प्रवास पूर्ण केला आहे.

देशभरातील ५१0 स्थानकांवर या गाडीने आपली उपस्थिती नोंदवली आहे. आत्तापर्यंतच्या १७५0 प्रदर्शन दिवसांमध्ये या प्रदर्शनास अतिप्रचंड असा १.७0 करोड दर्शकांचा प्रतिसाद लाभल्याने सायन्स एक्सप्रेस हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले प्रदर्शन बनले असून त्यासाठी तब्बल १२ वेळा लीमका बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विज्ञानाच्या राणीची दाखल घेतली गेली.

सायन्स एक्सप्रेसने आपल्या पहिल्या चार पर्वामध्ये जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दखल घेतली भारतातील समृध्द जैवविविधतेचा मागोवा घेणारे प्रदर्शन त्या पुढील तीन पर्वामध्ये सायन्स एक्सप्रेस जैवविविधता विशेष या नावाने प्रदर्शित झाले.

सायन्स एक्सप्रेस आठवे पर्व हे जागतिक तापमान वाढ आणि संबंधित आव्हानाना दर्शविणारे होते जे सायन्स एक्सप्रेस जलवायु परिवर्तन विशेष या नावाने प्रदर्शित केले गेले. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन नि:शुल्क आहे. तसेच प्रदर्शनाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी www.scienceexpress.in  या संकेतस्थळावर भेट देता येईल.

Web Title: Science Express on Sindhudurg station on 17th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.