देवगड तालुक्यातील कट्टा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:29 PM2017-12-04T16:29:47+5:302017-12-04T16:36:18+5:30
देवगड तालुक्यातील कालवी-कट्टा येथील परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत गेल्या चार दिवसांत एक गाय, एक वासरू व एक बैल अशी तीन जनावरे त्याने फस्त केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या भितीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
देवगड : तालुक्यातील कालवी-कट्टा येथील परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत गेल्या चार दिवसांत एक गाय, एक वासरू व एक बैल अशी तीन जनावरे त्याने फस्त केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या भितीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कालवी-कट्टा परिसरामध्ये गेले चार दिवस बिबट्याचे वास्तव्य असून सायंकाळी गुरे चरून आल्यानंतर बिबट्याने या जनावरांना मारल्याचे समजते. यात श्रीजीत मराठे यांची ४ वर्षांची गाय, प्रमोद जावकर यांचे ३ वर्षांचे वासरू यांना या बिबट्याने मारले असून त्यानंतर कट्टा येथील एका बैलाला मारल्याची घटना घडली आहे.
मृत जनावरांचा वनविभागामार्फत रितसर पंचनामा करण्यात आला असून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही वनविभागामार्फत न झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी हा बिबट्या ग्रामस्थांना कट्टा परिसरामध्ये दिसून आला असून वनविभागाने त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी, ग्रामस्थांतून होत आहे.