मालवणातील स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आक्रमक

By admin | Published: October 26, 2015 11:32 PM2015-10-26T23:32:05+5:302015-10-27T00:14:07+5:30

मासेमारीनंतर आता पर्यटन व्यावसायिकात ‘द्वंद्व’

Scuba diving commercial aggressor in Malwana | मालवणातील स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आक्रमक

मालवणातील स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आक्रमक

Next

मालवण : मालवण किनारपट्टी गेले काही दिवस मच्छिमारातील संघर्षाने ढवळून निघाली असतानाच मालवण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकात ‘जलक्रीडा’ पर्यटनावरून देवबाग विरुद्ध मालवणातील व्यावसायिक असे द्वंद्व सुरु झाले आहे.
देवबाग येथे एक खिडकी पद्धतीत सहभागी न होता वॉटरस्पोर्ट्स बरोबरच स्वतंत्र स्कुबा डायव्हिंग व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाविरोधात मालवण बंदर जेटी येथील स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आक्रमक बनले आहेत. तहसिलदार, बंदर निरीक्षक यांनी समजावूनही तो पर्यटन व्यावसायिक आपले आडमुठे धोरण सोडत नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. आम्हीही मालवण किनारपट्टीवर देवबाग धर्तीवर वाटरस्पोर्ट्स, बोटिंग, परासिलिंग आदी प्रकार सुरु करू, असा मालवणातील व्यावसायिकांनी इशारा दिला आहे. मालवण किनारपट्टीवरील समुद्रातील स्कुबा डायव्हिंग पर्यटन प्रकाराला देशी-विदेशी पर्यटकांची मोठी पसंती आहे. गेल्या काही वर्षात उदयास आलेल्या या व्यवसायात किनारपट्टीवरील मच्छीमार व युवक सहभागी झाले आहेत. सुरुवातीला स्वतंत्र व्यवसाय करताना कमी-अधिक दरावरून वादाचे प्रकार घडले. याचा पर्यटनावर परिणाम होऊ नये. पर्यटकांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेवून मालवणातील व्यावसायिक संस्थेच्या छताखाली एकत्र आले. संस्थेकडून या पर्यटन प्रकारच्या परवानगीसाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर केला. मंगळवार २७ आॅक्टोबरला या सर्वांची पाहणी करून लवकरच परवाने मिळणार आहेत. असे असताना देवबाग येथील एका व्यावसायिकाकडून स्कुबा डायव्हिंग सुरु करण्यात आले आहे. त्याच्या दरातही तफावत असून त्याचा इतरांवर परिणाम होत असल्याचे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे.या प्रकारानंतर सिंधुदुर्ग जलक्रीडा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, दामोदर तोडणकर आदी व्यावसायिकांची बैठक पार पडली. यावेळी जर हा व्यावसायिक मनमानी पद्धतीने व्यवसाय करीत असेल तर देवबागच्या धर्तीवर मालवण किनारपट्टीवर जलक्रीडा प्रकार कमी दरात पर्यटकांना उपलब्ध करून देवू असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

समान दर ठेवण्यास तयार
पर्यटकांच्या अधिक सुरक्षेसाठी संस्थेच्यावतीने सिलिंडरसह स्कुबा डायव्हिंग केले जात आहे. मात्र याचा वापर ‘त्या’ व्यावसायिकाकडून होत नाही.
याबाबत चार दिवसांपूर्वी तहसीलदार वनिता पाटील यांच्यासमोर बैठक झाली. त्यावेळी त्या व्यावसायिकाने आपला व्यवसाय स्वतंत्र आहे.
मालवणात येवून व्यवसाय करणे मला व माझ्या सहकाऱ्यांना शक्य नाही. इतरांप्रमाणे एकच दर ठेवून परवाना प्रक्रिया पूर्ण करून व्यवसाय करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याच धर्तीवर आज मालवण बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्यासमोर झालेल्या बैठकीत याच चर्चेचा सूर आळवला गेला आहे.

Web Title: Scuba diving commercial aggressor in Malwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.