सागरी मार्गावर सुरक्षा ‘कवच’

By admin | Published: November 18, 2015 11:23 PM2015-11-18T23:23:21+5:302015-11-19T00:46:18+5:30

आज होणार सांगता : जिल्ह्यातील किनारपट्टीवर ३६ तासांच्या मोहिमेस प्रारंभ

Security 'armor' on the sea route | सागरी मार्गावर सुरक्षा ‘कवच’

सागरी मार्गावर सुरक्षा ‘कवच’

Next

मालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा दलातर्फे राबवण्यात येणारे सागर सुरक्षा कवच मोहिमेस सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आज (बुधवारी) सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. ३६ तास चालणारी ही मोहीम गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेसाठी मालवण, आचरा येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून ८ अधिकाऱ्यांसह ९० कर्मचाऱ्यांच्या टीमने मालवण किनारपट्टी व सागरी मार्ग सील केले आहेत.
सागरी किनारपट्टी ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाची आहे. या किनारपट्टीवरील सुरक्षेला छेद देताना दहशतवाद्यांनी थेट देशाची आर्थिक राजधानी २६/११ च्या हल्ल्यांनी हादरवली होती. मात्र त्यानंतर सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य दिले गेले. काही महिन्यांच्या अंतराने किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच मोहीम राबवून अभेद्य सुरक्षेचा आढावा घेतला जातो.
मालवण किनारपट्टी भागातील मालवण आचरा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ठिकाणी स्पीड बोट, गस्त, मोटरसायकल तसेच तोंडवळी, आचरा येथे दोन टॉवर यांच्या माध्यमातून तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी करत (मालवण, आचरा) ८ अधिकाऱ्यांसह ९० सशस्त्र पोलीस कर्मचारी व सागर रक्षक सदस्य यांच्या सहकार्याने किनारपट्टी सील करण्यात आली आहे. समुद्रात बोटींची तर रस्त्यावर सर्वच वाहने तपासली जात आहेत. तर अन्य संशयास्पद हालचालीवर, व्यक्तीवर करडी नजर ठेवली जात आहे. मालवण प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम सशस्त्र पहारा देत आहेत. (प्रतिनिधी)
रेड टीम ब्ल्यू टीमचे सुरक्षा कवच भेदणार?
४या मोहिमेत सागरी सुरक्षेस असणाऱ्यांना ब्ल्यू टीम म्हणून या मोहिमेत ओळखले जाते. तर कोणत्याही प्रसंगाला ही ब्ल्यू टीम सज्ज आहे का? हे पाहण्यासाठी वेगळ्या प्रांतातील पोलिसांचीच रेड टीम ही सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करण्यासाठी सज्ज असते. जर रेड टीमला पकडण्यात ब्ल्यू टीम यशस्वी ठरली तर ब्ल्यू टीम पात्र ठरते. मात्र, रेड टीम ब्ल्यू टीमची सुरक्षा भेदण्यात यशस्वी ठरली तर ब्ल्यू टीमला कारवाईस तयार रहावे लागते. एकूणच या मोहिमेतून सागरी सुरक्षेचा लेखाजोगा मांडला जातो. उद्या गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या मोहिमेची सांगता होणार आहे.

Web Title: Security 'armor' on the sea route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.