सिंधुदुर्गात १६ पैकी ४ प्रकल्पांवर फक्त चौकीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 08:11 PM2021-06-25T20:11:27+5:302021-06-25T20:14:19+5:30
Irrigation Projects Konkan : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला दोन वर्षे उलटली. मात्र, यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा बेभरवशाचीच असल्याचे दिसत असून, १६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांवरच चौकीदार नेमण्यात आले आहेत. तर उर्वरित धरणांवर पाणी सोडण्यापुरते नामधारी असल्याचे दिसत असून शासनस्तरावर याची दखल घेऊन पावसाच्या तोंडावर चौकीदार नेमणे गरजेचे आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला दोन वर्षे उलटली. मात्र, यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. रत्नागिरीप्रमाणेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा बेभरवशाचीच असल्याचे दिसत असून, १६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांवरच चौकीदार नेमण्यात आले आहेत. तर उर्वरित धरणांवर पाणी सोडण्यापुरते नामधारी असल्याचे दिसत असून शासनस्तरावर याची दखल घेऊन पावसाच्या तोंडावर चौकीदार नेमणे गरजेचे आहे. अन्यथा शासन रामभरासे कारभारामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते एवढे नक्की म्हणावे लागेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीची घटना ताजी असतानाच जलसंपदाच्या लघुपाटबंधारे विभागाने धरण प्रकल्पावर असलेले चौकीदार सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदेच भरली नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.
तिवरे प्रकल्प मध्यरात्री फुटला. त्यानंतर त्यातील अनेक दोष समोर आले. त्यात विशेषत: धरणाच्या देखभालीचा विषय आल्याचे दिसून आले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने चोवीस तास धरणावर करडी नजर ठेवण्यासाठी दोन व्यक्तींची निवड केली होती. ती कंत्राटी पद्धतीची आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच्या उलट पावसाळी कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची नामधारी व्यवस्था करण्यात आली असून, अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो होते.
कायमस्वरूपी चौकीदार हवा
यातील काही प्रकल्प हे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या धरणांना पाणीगळती लागलेली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांवर कायमस्वरूपी चौकीदार नेमला जावा, अन्यथा रामभरोसे कारभारामुळे पुन्हा एकदा तिवरेसारखी घटना घडू नये एवढेच यातून दिसते आहे. तसेच अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यास यावेळी माणसाची गरज भासणार आहे. त्यामुळे तशी मागणी आता जोर धरत आहे.