जनआक्रोश समितीचे लाक्षणिक उपोषण : महिलांचा सहभागही लक्षणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:53 PM2019-04-16T14:53:37+5:302019-04-16T14:54:30+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त असलेली पदे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊनसुद्धा आर्थिक निधीची तरतूद करण्याकडे राजकीय नेते
दोडामार्ग : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त असलेली पदे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊनसुद्धा आर्थिक निधीची तरतूद करण्याकडे राजकीय नेते मंडळींनी केलेले दुर्लक्ष आदी कारणांमुळे सोमवारी आरोग्याचा जनआक्रोश समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राजकीय पुढाºयांच्या निषेधार्थ काळे झेंडे बांधण्यात आले.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला सन २०१३ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काम सुरू करण्याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जनआक्रोश आंदोलनावेळी आर्थिक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन सत्ताधाºयांकडून देण्यात आले होते. शिवाय दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात करारावर कंत्राटी स्वरूपात नेमलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयांची पदे त्यांचा करार संपण्याअगोदर भरली जातील, अशी आश्वासने देण्यात आली होती.
प्रत्यक्षात मात्र उपजिल्हा रुग्णालयासाठी निधीची आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. तसेच कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांचा करार संपल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त झाल्याने रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
तालुक्याच्या वैद्यकीय सेवेवर निर्माण झालेल्या या प्रश्नावर राजकीय नेते मंडळींनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ काळे झेंडे बांधून सोमवारी आरोग्याचा जनआक्रोश समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता. तोडगा न निघाल्याने हे उपोषण उशिरापर्यंत सुरू होते.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्याबाबत जनआक्रोश समितीतर्फे येथील ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.