कणकवली, जानवलीत सात फ्लॅट फोडले; रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला, चोरटे सीसीटीव्हीत कैद

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 23, 2024 12:00 PM2024-08-23T12:00:14+5:302024-08-23T12:01:05+5:30

तपासाचे पोलिसांसमोर आव्हान 

seven flats broken in Janwali, Kankavali; Cash and jewelery looted | कणकवली, जानवलीत सात फ्लॅट फोडले; रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला, चोरटे सीसीटीव्हीत कैद

कणकवली, जानवलीत सात फ्लॅट फोडले; रोख रकमेसह दागिन्यांवर डल्ला, चोरटे सीसीटीव्हीत कैद

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली येथील दीक्षा अपार्टमेंट आणि पीजी ग्रुप या दोन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये एकूण सात फ्लॅट चोरांनी फोडले. यात सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.  

गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फायदा चोरट्याने उठवला. घटनेची माहिती समजताच शुक्रवारी सकाळी कणकवली पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असून नजीकच्या ब्रह्माकुमारी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही वरून मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरटे या रस्त्यावरून जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे रामचंद्र शेळके व अन्य पोलिसांकडून सुरू आहे. 

तब्बल १४ तोळे दागिने लांबविले

कणकवलीतील एस एम हायस्कूल मध्ये कार्यरत असलेले शिक्षक  विजय सातपुते यांच्या मालकीच्या फ्लॅट मधील तब्बल १४ तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये सातपुते हे राहत होते.त्या ठिकाणी त्यांचे दोन फ्लॅट असून त्यांच्या बंद फ्लॅटमध्ये असलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

श्वान पथकाला प्राचारण

दीक्षा पार्क आणि परिसरात झालेल्या या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले होते. पथकाकडून तपासणी करण्यात येत होती. या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान कणकवली पोलिसांसमोर आहे. 

Web Title: seven flats broken in Janwali, Kankavali; Cash and jewelery looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.