कणकवलीत भरवस्तीत सात घरे, देशी बारमध्ये धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:37 PM2019-05-03T16:37:52+5:302019-05-03T16:42:19+5:30
कणकवली शहरातील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर चोराच्या टोळीने सात खोल्यांचे कुलूप कापून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला मात्र या घरांमध्ये रोख रक्कम सापडलेली नाही आचरा रस्त्यालगतच्या एका देशी बार मध्ये तीन हजार रुपये चोरीस गेल्याची माहिती पुढे आली आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे.
कणकवली : कणकवली शहरातील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर श्रीधर पार्क आणि लगतच्या इमारतीसह एका देशी बारमध्ये धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला आहे.
चोराच्या टोळीने सात खोल्यांचे कुलूप कापून आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला मात्र या घरांमध्ये रोख रक्कम सापडलेली नाही आचरा रस्त्यालगतच्या एका देशी बार मध्ये तीन हजार रुपये चोरीस गेल्याची माहिती पुढे आली आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे.
श्रीधर पार्क या बिल्डिंगमध्ये दोन बंद फ्लॅटचे लॉक कापण्यात आले आहे त्याच इमारतीमधील जयमाला मसुरकर यांच्याही फ्लॅटचे कुलूप कापले आहे तसेच विष्णू आत्माराम परब यांच्या फ्लॅटचे कुलुप कापून आतील सामान अस्ताव्यस्त करून टाकले.
लगतच्या एका इमारतीमधील रमेश परब यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झाला त्याच इमारतीच्या दुसऱ्या विंगमध्ये कृष्णा परब यांच्या वाहनात चे पेट्रोल काढून गाडीचे लॉक तोडण्याचाही प्रयत्न झाला आहे लगतच्या यमुना बिल्डिंगमध्ये देसाई व पारकर या दोघांचे फ्लॅटचे कुलुप कापण्यात आले आहेत तसेच आचरा रस्त्यालगतच्या देशी बार मधील तीन हजार रुपये चोरीस गेल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलीस स्टेशन पासून लगतच असलेल्या या इमारतीमध्ये चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे लोकसभा निवडणुकीनंतर पहिला चोरीचा प्रकार घडला आहे पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे