खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:38 AM2020-01-15T10:38:40+5:302020-01-15T10:42:59+5:30
तब्बल ४० लाख रुपयांच्या किमतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
Next
सावंतवाडी : तब्बल ४० लाख रुपयांच्या किमतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने माडखोल येथे हॉटेल सावली धाबा परिसरात केली.
संतोष गणू चव्हाण (रा. मालवण), उमेश बाळा मेस्त्री (बांदा), सुमित चंद्रकांत कडवेकर (कोल्हापूर), विकास प्रकाश चव्हाण (वारगाव), उदय श्रीकांत शेटे (लांजा), मधुसूदन वसंत राऊळ (माडखोल), गजानन अर्जुन सावंत, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे.