निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात महसुली अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:37 PM2019-02-22T15:37:00+5:302019-02-22T15:46:14+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या ७ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश आहे. बदल्यांच्या माध्यमातून रिक्त होणाºया जागांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सिंधुदुर्गनगरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या ७ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश आहे. बदल्यांच्या माध्यमातून रिक्त होणाºया जागांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात महसूल अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सध्या जोरदार सुरू आहे.
गुरूवारी २१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७ महसुली अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांची वनजमाव बंदी अधिकारी सिंधुदुर्ग या पदावर बदली झाली आहे. हे कार्यालय कोकण भवन येथे आहे. त्यांच्या जागी वनजमाव बंदी अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या शुभांगी साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांची दापोली उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
कणकवली उपविभागीय अधिकारी निता शिंदे यांची उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्रमांक - २६ पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी रायगड उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत मोहीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुडाळ तहसीलदार अजय घोळवे यांची अतिक्रमण निष्काशीत अधिकारी अंधेरी या पदावर बदली झाली आहे तर त्यांच्या जागी रत्नागिरी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभववाडी तहसीलदार संतोष जाधव यांची रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाली आहे तर त्यांच्या जागी म्हसळा तहसीलदार रामदास झळके यांची बदली करण्यात आली आहे. मालवण तहसीलदार समीर घारे यांची दापोली तहसीलदार पदावर तर पेण तहसीलदार पदावर अजय पाटणे यांची त्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
वेंगुर्ला तहसीलदार शरद गोसावी यांची रायगड जिल्ह्यातील म्हसळा तहसीलदार पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी उपनगर येथील तहसीलदार निवडणूक अधिकारी प्रवीण लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील रजा आणि राखीव तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांची येथील तहसीलदार पुनर्वसन या पदावर बदली करण्यात आली आहे.