सतरा वाघनख्यांसह बिबट्याचे अवशेष जप्त, पाच ते सात महिन्यांपूर्वी केली होती शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:52 PM2022-05-19T17:52:40+5:302022-05-19T17:53:14+5:30

प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली.

Seventeen tiger cubs with leopard remains seized five to seven months ago | सतरा वाघनख्यांसह बिबट्याचे अवशेष जप्त, पाच ते सात महिन्यांपूर्वी केली होती शिकार

सतरा वाघनख्यांसह बिबट्याचे अवशेष जप्त, पाच ते सात महिन्यांपूर्वी केली होती शिकार

Next

कणकवली : बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांपैकी वामन शिवाजी देवळेकर (वय ४३, रा. महाळुंगे-देवगड) याच्याकडून बिबट्याच्या जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे, आदी अवशेषांसह शिकारीसाठी वापरलेला भाला, ॲल्युमिनिअम तारेची फासकी, कोयता, छोटा सुरा, आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

बिबट्या कातडी तस्करी प्रकरणात सुरुवातीला दारूम माळवाडी येथे दोन व नंतर महाळुंगे येथे एक अशा तीन संशयितांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे बिबट्याच्या शिकारीतील प्रमुख सूत्रधार वामन शिवाजी देवळेकर (४३), जयसिंग पांडुरंग नवले (४६) आणि राकेश पांडुरंग नवले (३६, सर्व रा. महाळुंगे) या तिघांना अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

या तिघांपैकी वामन देवळेकर या प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकारी अनिल हाडळ, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे, पांडुरंग पांढरे यांनी बुधवारी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी फासकी लावून बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली. तसेच शिकारीसाठी वापरलेला भाला, फासकीची तार व अन्य साहित्यही पोलिसांकडे दिले.

पाच ते सात महिन्यांपूर्वी वामन देवळेकर, जयसिंग नवले आणि राकेश नवले या तिघांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याची शिकार केली होती. त्यानंतर बिबट्याचे कातडे काढले, नखे काढली आणि हे सर्व अवशेष विक्रीच्या 4 उद्देशाने जंगलात लपवून ठेवले होते. या प्रकरणात यापूर्वी अटक केलेले सुभाष तावडे (रा. ओझरम), प्रकाश देवळेकर, संजय घाडीगावकर (रा. महाळुंगे) यांचा सहभाग कातडीच्या विक्री व्यवहारात होता. पोलिसांनी ३ बिबट्याच्या शिकारप्रकरणी सर्व माहिती संशयित आरोपीकडून घेत अवशेष जप्त केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.

Web Title: Seventeen tiger cubs with leopard remains seized five to seven months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.