शरद पवारांमुळे गरिबांचे स्वप्न साकार : के. जी. केळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 03:39 PM2019-12-13T15:39:45+5:302019-12-13T15:42:09+5:30

माजी केंद्रिय कृषिमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यात गोरगरीब मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले. वेंगुर्ला येथील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शरद पवार व माजी विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या मैत्रीतून साकार झाले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. के. जी केळकर यांनी केले. लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे आयोजित आरोग्य मेळाव्यात ते बोेलत होते.

Sharad Pawar's dream for the poor: K Yes. Kelkar | शरद पवारांमुळे गरिबांचे स्वप्न साकार : के. जी. केळकर

शरद पवारांमुळे गरिबांचे स्वप्न साकार : के. जी. केळकर

Next
ठळक मुद्देशरद पवारांमुळे गरिबांचे स्वप्न साकार : के. जी. केळकरवेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे आयोजित आरोग्य मेळाव्याला प्रतिसाद

वेंगुर्ला : माजी केंद्रिय कृषिमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्र राज्यात गोरगरीब मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले. वेंगुर्ला येथील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शरद पवार व माजी विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांच्या मैत्रीतून साकार झाले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. के. जी केळकर यांनी केले. लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे आयोजित आरोग्य मेळाव्यात ते बोेलत होते.

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे आयोजित आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन डॉ. केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेवर विशेष प्रेम असल्याने कोकणातील विकासाकडे त्यांचे सदैव लक्ष असल्याचे प्रमुख अतिथी प्रदेश राष्ट्रवादीचे सदस्य व युवानेते अबीद नाईक यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषीभूषण एम. के. गावडे यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून देशात झालेल्या कृषी क्रांती बाबतीत माहिती दिली. महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी आपले विचार मांडले.

यावेळी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, उपतालुकाध्यक्ष योगेश कुबल, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब, डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉ. प्रसाद प्रभुसाळगावकर, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा दीपिका राणे, वनिता मांजरेकर, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष रोहन वराडकर आदी उपस्थित होते. स्वागत डॉ. लिंगवत यांनी, आभार साटेलकर यांनी मानले.

आरोग्य शिबिरात १३५ रुग्णांचा सहभाग

उपस्थित रुग्णांची जनरल फिजिशियन डॉ. गौरव घुर्ये, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. हितेश रावराणे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश लिंगायत, होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. संजीव लिंगवत, डॉ. परब, स्त्रीरोग चिकित्सक व आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सई लिंगवत, डॉ. रवींद्र्र बुरूड, डॉ. आकार घाडी, डॉ. मानसी सातार्डेकर, डॉ. योगिता सावंत यांनी तपासणी करून मोफत उपचार केले. आरोग्य शिबिराचा १३५ रुग्णांनी लाभ घेतला.

Web Title: Sharad Pawar's dream for the poor: K Yes. Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.