नवा कालभैरव देवस्थानचा आजपासून शिमगोत्सव
By admin | Published: March 11, 2017 10:16 PM2017-03-11T22:16:32+5:302017-03-11T22:16:32+5:30
रंगपंचमीचा उत्सव रंगणार
अडरे : चिपळूण शहराचे सुप्रसिध्द देवस्थान ग्रामदैवत श्री देव नवा कालभैरव देवस्थान, चिपळूणतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिमगा महोत्सव दि. १२ ते १९ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. १२ रोजी रात्री १.३० वाजता पालखी श्रींचे मंदिरातून होमावरुन गौतमेश्वर गल्लीतील दोन्ही बाजूच्या आरत्या घेऊन मारुती चौकापर्यंत येईल. सोमवार, दि. १३ रोजी सकाळी ४.३० वाजता प्रभात रोडवरील डाव्या बाजूच्या आरत्या घेत चिंगळे यांच्या आवारात बसेल. तेथून श्री दत्त मंदिर, खेर्डी येथे बसेल. नंतर दयाघन अपार्टमेंटकडून रावतळे येथील आरत्या घेऊन श्री देवी विंध्यवासिनी भेटीला श्रींची स्वारी जाईल. दिवसभरात वडार कॉलनीपर्यंतच्या आरत्या घेऊन मंगळवारी पहाटे श्रींचे सहाणेवर बसणार आहे.
मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता निघून होमावरुन शिवाजी चौक चिंचनाका येथे मनोहर हॉटेल पासून भोगाळेमार्गे मध्यवर्ती एस्. टी. बसस्थानकाकडून वीरेश्वर कॉलनीतील आरत्या घेऊन शेवटी शिवनदी पुलावरुन चिंचनाक्यातून आरत्या घेऊन वडनाकामार्गे बुधवारी सकाळी श्रींचे सहाणेवर जाणार आहे.
दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता श्रींचे मंदिरातून निघून होमावरुन श्री वेस मारुती मंदिरामागून रामतीर्थमार्गे शंकरवाडी, भोईवाडा करुन श्री साई मंदिरात बसेल. त्यानंतर पप्पू कदम यांच्या घरासमोरुन दोन्ही बाजूच्या आरत्या घेऊन श्री देवी भवानी मंदिरात बसेल. त्यानंतर सायंकाळपर्यंत श्रीराम चौक, शेट्येआळीपर्यंतच्या आरत्या घेऊन गुरुवारी सकाळी सहाणेवर येईल.
शनिवार, दि. १८ रोजी सकाळी ५ वाजता श्रींच्या मंदिरातून निघून होमाला प्रदक्षिणा घालून रामतीर्थ रोडमार्गे पवार यांची आरती घेऊन पाटील ते डांगे घरापर्यंत दोन्ही बाजूच्या आरत्या घेऊन राहुल गार्डन आवारात बसेल. परतीच्या प्रवासात देव लक्ष्मीनारायणमार्गे चितळे व कुलकर्णी यांच्या आवारात बसतील. त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत सहाणेवर बसणार आहेत. (वार्ताहर)
रंगपंचमीचा उत्सव रंगणार
दि. १६ रोजी पालखी श्रींचे सहाणेवरुन निघून गुहागर रोडने आरत्या घेत मारवाडी आळीतून, शिवनदी पुलावरुन गुरवआळी, वडनाक्यापर्यंतच्या आरत्या घेत शुक्रवारी दुपारपर्यंत श्रींचे सहाणेवर येणार आहे. नंतर श्री देव कालभैरव लळिताचा कार्यक्रम होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. १७ रोजी रंगपंचमी आहे. यादिवशी संपूर्ण चिपळूण शहरात रंगपंचमी खेळण्यात येणार आहे.
दि.१२ रोजी रात्री १.३० वाजता आरत्या घेऊन मारुती चौकापर्यंत येईल.
सोमवारीही विविधर् िठकाणी पालख्यांचा रंगणार भक्तभेटीचा सोहळा.
शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत सहाणेवर बसणार आहे. शिमगोत्सवाची होणार शनिवारी सांगता.