Shivsena: शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
By अनंत खं.जाधव | Published: September 1, 2022 08:47 PM2022-09-01T20:47:42+5:302022-09-01T20:50:35+5:30
शिक्षकांकडून अतिरिक्त कामे कोण करून घेत असेल तर ते चुकीचे आहे.
सावंतवाडी : शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर आहेत, असे कोण सांगत असेल तर ती त्यांचे स्वप्न आहे. आणि ती दिवास्वप्नेच राहातील, आपले आमदार साभाळा नाहीतर एक आमदार अगोदरच गेला आता आहे ते जरी गेले तरी कळणार नाही.त्यामुळे चुकीची वक्तव्ये करून नका असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. त्यांनी गुरुवारी सावंतवाडीत पत्रकारांशी सवाद साधतना वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडली यावेळी त्यांनी शिक्षकांकडे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी दिली पाहिजे. राष्ट्रीय जबाबदारी सोडून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला जात असेल तर त्याबद्दल आपण निश्चितच पुनर्विचार करू असे ही सांगितले.
शिक्षकांकडून अतिरिक्त कामे कोण करून घेत असेल तर ते चुकीचे आहे. मात्र, राष्ट्रीय कामे त्यांच्याकडून करून घेतलीच पाहिजेत. मात्र अन्य कामे त्यांच्याकडून कोण करून घेत असेल तर या प्रकाराची चौकशी केली जाईल.येत्या आठवड्यात बैठक घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, चुकीच्या पद्धतीने आदेश देणाऱ्यांची चौकशी केली जाईल, अशी भुमिका ही केसरकर यांनी घेतली.शिंदे गटातील आमदार जाणार नाहीत, असे सांगितले. मात्र कोण दावा करत असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. अशा प्रकारे कोणीही जाणार नाहीत. वारंवार यापूर्वी दावे केले जात आहेत. मात्र ते त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असाही टोला त्यांनी आणला.
आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या विधानाबाबत मंत्री केसरकर यांना विचारले असता याबाबत आपल्याला अद्याप पर्यंत माहिती घेतली नाही. त्यामुळे मी कोणतेही वक्तव्य करणार नाही, माहिती घेऊन निश्चितच बोलेन, असा दावाही त्यांनी यावेळी केला.