आगामी निवडणुका शिवसेना-भाजप युती करूनच लढवणार : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 05:30 PM2018-09-08T17:30:56+5:302018-09-08T17:33:33+5:30
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे, त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. मंत्री मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या पाहणीसाठी आले होते.
सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे, त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. मंत्री मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या पाहणीसाठी आले होते.
गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार आहे, प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याची घोषणाही बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडीत केली. तसेच आंबोली चौकुळला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी तांत्रिक व न्यायालयीन कामात अडकले आहेत मात्र यावर विचार करण्यासाठी खास समिती बसविण्यात आली आहे,असे पाटील यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखद होणार, असे बांधकाम मंत्री पाटील यांनी सांगितले.
मुंबई-पुणे मार्गे कोकणात येणाऱ्यासाठी चाकरमान्यांना प्रवास टोल फ्री असेल तसेच मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा हा खरोखरच समाधानकारक आहे, असे पाटील यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी दीपक केसरकर, राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, महेश सारंग, मनोज नाईक, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.