शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर
By सुधीर राणे | Published: January 27, 2024 05:23 PM2024-01-27T17:23:29+5:302024-01-27T17:24:00+5:30
कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ...
कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देणार आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यासह आंगणेवाडीच्या भराडी देवीचे दर्शन देखील ते घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
४ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे सावंतवाडी येथे सकाळी ११.३० वाजता गांधी चौक या ठिकाणी भेट देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता कुडाळ येथील जिजामाता चौक, दुपारी १.३० वाजता मालवण विश्रामगृह, त्यानंतर दुपारी 2 वाजता सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट. दुपारी ३.३० वाजता मालवण आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन, सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी मुक्काम व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार.
५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद, सकाळी ११.३० वाजता तळेरे, दुपारी १२ वाजता राजापूर जकात नाका, दुपारी १२.३० वाजता धुत पापेश्वर मंदिराची पाहणी. दुपारी १ वाजता बारसू येथे देवाचे गोठणे येथे भेट, त्यानंतर १.४५ वाजता पावस मार्गे रत्नागिरी. दुपारी २.३० वाजता रत्नागिरी, ३.३० वाजता देवरुख, सायंकाळी ५ वाजता चिपळूण व तिथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या दौऱ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.