कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 07:59 PM2020-11-27T19:59:58+5:302020-11-27T20:02:09+5:30

kankvali, shivsena, sindhudurgews, sandeshparkar, कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरोत्थान योजनेमधून सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी २ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ५ कोटिंचा असा तब्बल ११ कोटींचा निधी शहरासाठी देण्यात आला आहे. याशिवाय अन्य कामांसाठीही निधी देण्यात आला असून आम्ही नगरपंचायतीतील सत्तेत नसलो तरी निधी देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.

Shiv Sena committed for development of Kankavli city! | कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध !

कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध !

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध ! संदेश पारकर यांची माहिती ; दोन वर्षात दिला अकरा कोटिंचा निधी

कणकवली : कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरोत्थान योजनेमधून सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी २ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ५ कोटिंचा असा तब्बल ११ कोटींचा निधी शहरासाठी देण्यात आला आहे. याशिवाय अन्य कामांसाठीही निधी देण्यात आला असून आम्ही नगरपंचायतीतील सत्तेत नसलो तरी निधी देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.

कणकवली येथील विजयभवनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव , राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, तेजस राणे, गुरू पेडणेकर, नगरसेविका मानसी मुंज, माही परुळेकर,साक्षी आमडोस्कर , प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.

यावेळी संदेश पारकर म्हणाले, सन २०१८- १९ मध्ये दिलेल्या निधीमध्ये क्रीडांगण आरक्षणासाठी ४ कोटी, शहरातील रस्ते व गटार साठी ३० लाख , अग्निशामक केंद्रासाठी तसेच अन्य विकासकामांसाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी शिवसेनेने दिला आहे. तर पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक , आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी यावर्षी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे.

त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरणसाठी १ कोटी , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभीकरणसाठी १ कोटी तर अन्य विकासकामांसाठी ३ कोटीच्या निधीचा समावेश आहे.तसेच बस स्थानक आवारात भव्य व्यापारी संकुल निर्मितीबाबत लवकरच परिवहनमंत्री अनिल परब धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे सभामंडप उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे.

कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच झुकते माप देत आहे. लवकरच या विकास कामांचे भूमिपूजन होऊन वर्षभराच्या काळात ती कामे लोकार्पणही केली जातील. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असून या वर्षातील ८ महिने कोरोना काळात गेले आहेत. उर्वरित ४ महिन्यात राज्याला विधायक दिशा देणारे विकासात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने राज्यकारभार केला आहे.
जिल्हा विकासासाठीही हितावह निर्णय घेण्यात आले आहेत.

कोरोनाशी सामना करताना खंबीरपणे पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर , आमदार वैभव नाईक यांनी जिल्हावासीयांना साथ दिली आहे. ओरोस येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असून कोव्हीड -१९ च्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९६६ कोटी निधीची मान्यता देण्यात आली आहे. तसेच तत्काळ १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

गरज पडल्यास आंदोलनही करू !

कणकवली शहरातील ४५ मीटरच्या आत आरओडब्ल्यू मधील जागा आणि मालमत्ता ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मालकीची आहे. त्या जागेत असलेली अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार आहेत. आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नी गरज पडल्यास निश्चितच आंदोलन करण्यात येईल. महामार्गा बाबतच्या समस्या सोडविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. असेही संदेश पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title: Shiv Sena committed for development of Kankavli city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.