Nitesh Rane: “मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत”; दीपक केसरकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:25 AM2021-12-28T10:25:12+5:302021-12-28T10:26:29+5:30

ते वाघाला घाबरतात की, कोर्टाला हे माहिती नाही, पण आता ते घाबरलेत ही वस्तूस्थिती आहे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

shiv sena deepak kesarkar reaction on bjp nitesh rane narayan rane santosh parab attack case | Nitesh Rane: “मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत”; दीपक केसरकरांचे टीकास्त्र

Nitesh Rane: “मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत”; दीपक केसरकरांचे टीकास्त्र

Next

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.

जे गुन्हेगार असतात ते सर्वांत जास्त पोलिसांना घाबरतात. प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. पण शेवटी दुसऱ्याला चिडवायला जातो आणि म्याव म्याव करत असतो तेव्हा तेच करण्याची परिस्थती दैव आपल्यावर आणते हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपले वागणे चांगले ठेवले पाहिजे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. ते सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते. 

तेच मांजरासारखे लपून बसले आहेत

जे दुसऱ्यांना चिडवत असतात, त्यांच्यावर अशी वेळ ईश्वर कधी ना कधी आणत असतो. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ते वाघाला घाबरतात की, न्यायालयाला हे माहिती नाही, पण घाबरत आहेत, हीदेखील वस्तुस्थिती आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. 

उत्तर पदेशात काय झाले हे आपण पाहिले

नारायण राणे आपण केंद्रात मंत्री आहोत, म्हणून आपल्या मुलाला वाचवणार अशी भूमिका घेणार असतील तर उत्तर पदेशात काय झाले हे आपण पाहिले आहे. मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय उद्रेक होते हेदेखील लोकांनी पाहिले आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात आणि शांतताप्रिय सिंधुदुर्गात होऊ नये इतकीच आशा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना वकील संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. त्यावेळी त्यांच्याबरोबर राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब, प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम सहकार्यासाठी असणार आहे. तर विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील. दुसरीकडे, नारायण राणे नागपूर दौरा सोडून कणकवलीत आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
 

Web Title: shiv sena deepak kesarkar reaction on bjp nitesh rane narayan rane santosh parab attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.