बाळासाहेबांना हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली, बबन साळगावकर यांची टीका

By अनंत खं.जाधव | Published: January 12, 2024 04:14 PM2024-01-12T16:14:21+5:302024-01-12T16:15:12+5:30

Shiv sena News: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे.

Shiv Sena has fallen into the hands of those who call Balasaheb a dictator, Baban Salgaonkar criticizes | बाळासाहेबांना हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली, बबन साळगावकर यांची टीका

बाळासाहेबांना हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली, बबन साळगावकर यांची टीका

सावंतवाडी -  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हुकुमशहा म्हणणाऱ्यांच्या हातात शिवसेना गेली अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे.आता हे 42 आमदार बाळासाहेबांचा विचार पुढे नेतील असं सांगून बाहेर पडलेले आहेत. हे 42 जणही  शेवटपर्यंत बाळासाहेबांचा विचार जोपासू असं प्रतिज्ञापत्र जनतेच्या न्यायालयात सादर करतील करतील काय ? असा सवाल ही साळगावकर यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.
विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली तेव्हा अनेकांच्या साक्षी झाल्या यात सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जी साक्ष दिली ती ऐकल्यानंतर आश्चर्य वाटले मंत्री केसरकर यांना विचार नाही जिथे सत्ता तिथे ते अशीच त्यांची राजकीय कारकीर्द आहे.

मात्र त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हुकूमशहा म्हणने कितपत योग्य आहे असा सवाल ही उपस्थित केला असून आता केसरकर यांच्या सह हे 42 आमदार बाळासाहेबांचा विचार पुढे नेतील असं सांगून बाहेर पडलेले आहेत. हे 42 जणही  शेवटपर्यंत बाळासाहेबांचा विचार जोपासणार का ते बघूया त्यांनी जनतेच्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र द्यावे अशी मागणी ही साळगावकर यांनी केली आहे.

Web Title: Shiv Sena has fallen into the hands of those who call Balasaheb a dictator, Baban Salgaonkar criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.