कणकवली शहरात शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:54 PM2020-12-08T14:54:48+5:302020-12-08T14:56:33+5:30

Shivsena, Kankavli, Shindudurngnews सत्ता महाविकास आघाडीची असून यापुढे विकासकामे गतीने होतील. त्यामुळे कणकवली शहरात किमान ४००० शिवसेनेचे सदस्य झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.

Shiv Sena launches member registration in Kankavli city | कणकवली शहरात शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ

कणकवली येथे शिवसेना सभासद नोंदणीचे अर्ज शिवसैनिकांकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी अतुल रावराणे, शैलेश भोगले, नीलम पालव, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सुजित जाधव, हर्षद गावडे आदी उपस्थित होते. (छाया : अनिकेत उचले)

googlenewsNext
ठळक मुद्देचार हजार सदस्य नोंदणी करा : अतुल रावराणे, विकासाचा झंझावात कायम राहीलकणकवली शहरात शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ

कणकवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारे अनेक पक्षविरहीत कार्यकर्ते समाजात आहेत. त्यामुळे सदस्य नोंदणी देखील संघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांची करा. विकासाचा झंझावात यापूर्वीदेखील आमदार वैभव नाईक यांनी राखला. आता सत्ता महाविकास आघाडीची असून यापुढे विकासकामे गतीने होतील. त्यामुळे कणकवली शहरात किमान ४००० शिवसेनेचे सदस्य झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.

कणकवली शहर शिवसेनेच्यावतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ विजय भवन येथून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष निरीक्षक विकास कुडाळकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, नगरसेविका माही परुळेकर, मानसी मुंज, अँड. हर्षद गावडे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, प्रसाद अंधारी, सोमा गायकवाड, वैभव मालंडकर, गौरव हर्णे, संतोष पुजारे, तेजस राणे आदी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी अतुल रावराणे म्हणाले, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर प्रेम करण्यापेक्षा पक्षावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची नोंदणी झाली पाहीजे. जेणेकरून आयाराम, गयाराम थांबले पाहिजेत. सुशांत नाईक म्हणाले, हे अभियान म्हणजे सेनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे यासोबतच मतदारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या निवारण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

यावेळी कणकवली वरचीवाडी महिला शाखाप्रमुखपदी रोहिणी पिळणकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत अभिनंदन करण्यात आले. तर आभार नगरसेवक सुशांत नाईक यांनी मानले.

कणकवलीत प्रभागनिहाय सदस्य नोंदणीची देण्यात आलेली जबाबदारी

प्रभागनिहाय सदस्य नोंदणीसाठी जबाबदारी देण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. १ - शेखर राणे, संतोष राणे, तेजस राणे. प्रभाग क्र. २ - साक्षी आमडोस्कर, रोहिणी पिळणकर, प्रमोद पिळणकर. प्रभाग क्र. ३ - संजना संत, रवी राणे, सुमित राणे. प्रभाग क्र. ४ - दादा परब, भिवा परब. प्रभाग क्र. ५ - अश्विनी मोर्ये, मेघन सरंगले. प्रभाग क्र. ६ - संदेश वाळके, कन्हैया पारकर, आदित्य सापळे. प्रभाग क्र. ७ - प्रसाद अंधारी, महेश देसाई. प्रभाग क्र. ८ - अनिल जाधव, लुकेश कांबळे, भक्ती जाधव. प्रभाग क्र. ९ - वैभव मालंडकर, विलास कोरगावकर, समीर सावंत. प्रभाग क्र. १० - सोमा गायकवाड, माही परुळेकर, प्रमोद मसुरकर, संतोष पुजारे. प्रभाग क्र. ११ - सुजित जाधव, संतोष पुजारे. प्रभाग क्र. १२ - गौरव हर्णे, बाळा वराडकर. प्रभाग क्र. १४ -अमित मयेकर, रुपेश नार्वेकर, संजय पारकर, अजित काणेकर, अमोल रासम. प्रभाग क्र. १५ - योगेश मुंज. प्रभाग क्र. १६ - सोहम वाळके, रुपल परब. प्रभाग क्र. १७ - समीर सावंत, बाबू जाधव अशी प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली असून प्रभागात २०० हून अधिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.





 

Web Title: Shiv Sena launches member registration in Kankavli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.