कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर !, शिवसेना नेते संदेश पारकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 04:13 PM2022-04-01T16:13:51+5:302022-04-01T16:14:35+5:30

कणकवली : कणकवली शहरात सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर माफियाराज सुरू आहे. बिल्डरमाफियाशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा हडप ...

Shiv Sena leader Sandesh Parkar alleges abuse of power by Kankavli Nagar Panchayat authorities | कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर !, शिवसेना नेते संदेश पारकरांचा आरोप

कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर !, शिवसेना नेते संदेश पारकरांचा आरोप

googlenewsNext

कणकवली : कणकवली शहरात सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर माफियाराज सुरू आहे. बिल्डरमाफियाशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा हडप करणे, जमीनमालक, भाडोत्रीना वेगवेगळी आमिषे दाखवून आणि धाक दाखवून जमीन ताब्यात घेतली जात आहे. कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱयांकडून  सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप  शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला आहे. जानवली येथील हॉटेल रिलॅक्समध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संदेश पारकर पुढे म्हणाले, कणकवली शहरातील टोणेमारे बिल्डिंगला आग लावण्यात आली. जळकेवाडीतील बिल्डिंग पाडण्यात आली. तसेच आणखी एका ठिकाणी अशीच दडपशाही करण्यात आली. अप्पासाहेब पटवर्धन चौकापासून जवळच असलेल्या  अभ्युदय बँकेशेजारील मोरये बिल्डिंग या ३ मजली इमारतीवर दरोडा टाकण्यात आला. जेसीबी लावून मध्यरात्री ती इमारत पाडण्यात आली. भाडोत्रीचे सामान चोरून नेण्यात आले. याबाबत तक्रार देऊनही ७ दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांची भूमिका कुंपणाने शेत खाल्ल्यासारखी आहे.

जेसीबी घेऊन काही लोक  शहरात कोणाचीही इमारत स्वतःच्या फायद्यासाठी तोडण्यासाठी सोकावले आहेत. लँडमाफिया, बिल्डरमाफिया केव्हाही आपल्या मालमत्तेवर कब्जा करतील अशी भीती कणकवली शहरातील नागरिकांना  आहे. सतत तीन  दिवस अतिक्रमण करून इमारत तोडली जात असताना पोलीस बघत बसले हे निंदनिय आहे.

कणकवली ही परमहंस भालचंद्र महाराजांची आणि कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांची भूमी आहे. या भूमीत अती करणाऱ्यांची माती होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा माझा स्वभाव आहे. कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांच्या या अन्यायाविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे गृहमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचेही पारकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Shiv Sena leader Sandesh Parkar alleges abuse of power by Kankavli Nagar Panchayat authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.