शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको, विनायक राऊतांचा संभाजीराजेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 02:36 PM2022-05-27T14:36:29+5:302022-05-27T17:51:21+5:30

मुख्यमंत्री तुमचा आदर राखतात म्हणूनच त्यांनी तुम्हाला शिवबंधन बांधण्यास सांगितले होते.

Shiv Sena opinion works then why not Shivbandhan, Vinayak Raut question to Sambhaji Raje from Rajya Sabha candidature | शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको, विनायक राऊतांचा संभाजीराजेंना सवाल

शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको, विनायक राऊतांचा संभाजीराजेंना सवाल

googlenewsNext

सावंतवाडी : संभाजीराजे यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शब्द मोडल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेने पलटवार केला असून, शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको असा सवाल शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर उपस्थित होते.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत लढण्यावर संभाजीराजे ठाम होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांनी संभाजीराजेंना ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याची ऑफर दिली होती. महाविकास आघाडीकडे पुरेशी मते असल्याने संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. मात्र, संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची अट घालण्यात आली होती. पण ही अट त्यांनी अमान्य केल्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली.

तुम्ही राजे आहात असे बोलणे योग्य नाही

यानंतर संभाजीराजेंनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपणास दिलेला  शब्द पाळला नसल्याचा आरोप करत ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला असे सांगत राज्यसभा लढवणार नसल्याची घोषणा केली. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. संभाजीराजे ना शिवसेनेची मते चालतात मग शिवबंधन का नको असा सवाल करत तुम्ही राजे आहात असे बोलणे योग्य नाही.

..तर आम्हाला आनंद झाला असता

मुख्यमंत्री तुमचा आदर राखतात म्हणूनच त्यांनी तुम्हाला शिवबंधन बांधण्यास सांगितले होते. मग शब्द फिरवला असे कसे म्हणता असा सवाल राऊत यांनी केला आहे. राजे जर शिवसेना पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेत गेले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता असेही राऊत म्हणाले.

Web Title: Shiv Sena opinion works then why not Shivbandhan, Vinayak Raut question to Sambhaji Raje from Rajya Sabha candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.