कणकवलीत शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:23 PM2020-10-01T20:23:37+5:302020-10-01T20:29:06+5:30
shiv sena, protests, BJP government, kankavali, shindhedurg news निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती , पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. असा आरोप करीत शिवसेनेकडून गुरुवारी भाजपा प्रणित केंद्रशासनाचा कणकवली येथे निदर्शने करीत निषेध करण्यात आला.
कणकवली : निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती , पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. असा आरोप करीत शिवसेनेकडून गुरुवारी भाजपा प्रणित केंद्रशासनाचा कणकवली येथे निदर्शने करीत निषेध करण्यात आला.
केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार असून तेथे महिला सुरक्षित नाहीत . उत्तरप्रदेश येथे एका युवतीवर सामुदायिक अत्याचार झाल्यावर कुटुंबियांना विश्वासात न घेता पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले . या घटनेनंतरही तीच्या कुटूंबियांची परवड थांबली नाही .
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत- पालव , वैदेही गुडेकर , माधवी दळवी , नगरसेविका मानसी मुंज , उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये ,सुजीत जाधव, नगरसेवक सुशांत नाईक , नगरसेवक कन्हैया पारकर , युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू , माजी नगरसेवक भूषण परुळेकर , योगेश मुंज , ललित घाडीगांवकर , वैभव मालंडकर, रमेश चव्हाण , राजू राणे , राजन म्हाडगुत , विलास गुडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी नीलम सावंत- पालव म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या सामुदायिक अत्याचाराच्या घटना येत्या काळात थांबवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, भाजपाच्या केंद्र व उत्तर प्रदेशच्या राज्य शासनाकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे त्या शासनाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.