शिवसेना उपशहरप्रमुखाच्या दोन गाड्या फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:05 AM2018-01-13T01:05:34+5:302018-01-13T01:06:17+5:30

Shiv Sena split two sub-divisional headquarters | शिवसेना उपशहरप्रमुखाच्या दोन गाड्या फोडल्या

शिवसेना उपशहरप्रमुखाच्या दोन गाड्या फोडल्या

googlenewsNext


कणकवली : शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या दोन गाड्यांची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे. मसुरकर राहत असलेल्या शहरातील पमाज सिटी सेंटर या बिल्डिंगसमोर लावण्यात आलेल्या फोक्सवॅगन आणि बोलेरो या दोन गाड्यांच्या दर्शनी काचा दगड मारून अज्ञाताकडून फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कणकवली शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तृळात खळबळ माजली आहे. या घटनेबाबत प्रमोद मसुरकर यानी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री १ वाजल्यानंतर आपल्या बिल्डिंग समोर लावलेल्या गाड्या फोडल्याची शक्यता प्रमोद मसुरकर यांनी वर्तविली आहे. आपले कोणाशीहि वैमनस्य नाही. तरीही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने त्याचे आश्चर्य वाटत असल्याचेही ते म्हणाले.
मसुरकर यांच्या गाड्यांच्या दर्शनी भागाच्या काचा फोडल्याची माहिती कणकवली शहरासह जिल्'ात सर्वत्र अल्पावधितच पसरली. त्यामुळे या हल्ल्याची गंभीर दखल शिवसेनेने घेतली आहे. शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे यांनी प्रमोद मसुरकर यांच्या निवासस्थानी जात घटनेची माहिती घेतली.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख शेखर राणे, सुजित जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते. प्रमोद मसुरकर यांनी गाड्या फोडल्याच्या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
भंडारी महासंघाकडून निषेध !
प्रमोद मसुरकर हे कणकवली तालुका भंडारी समाज तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा विक्रुत प्रवृत्तीचा सिंधुदुर्ग जिल्'ा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल बंगे यांनी जाहीर निषेध केला आहे. जिल्ह्यातील भंडारी समाजाची व्यक्ती कुठल्या पक्षात समाज कार्य करीत आहे. हे ज्याचा त्याच्या विचारसरणीचा भाग आहे .परंतु ,भंडारी समाजाच्या व्यक्तिला राजकीय पटलावरून नामशेष करण्यासाठी कोणी प्रयत्न करीत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील भंडारी समाज प्रमोद मसुरकर यांच्या पाठीशी आहे असे अतुल बंगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Shiv Sena split two sub-divisional headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.