Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल 

By अनंत खं.जाधव | Published: April 1, 2023 06:34 PM2023-04-01T18:34:14+5:302023-04-01T18:35:43+5:30

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे   एप्रिल फुल ...

Shiv Sena Thackeray group's unique protest against minister Deepak Kesarkar | Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल 

Sindhudurg- मंत्री दीपक केसरकरांविरोधात अनोखे आंदोलन,' एप्रिल फुल, आमदार गुल' म्हणत बडवले ढोल 

googlenewsNext

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे   एप्रिल फुल आमदार गुल अशा घोषणा देत ढोल बडवून केसरकर यांचा निषेध नोंदवला. शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्या नेतृत्वाखाली येथील एसटी बसस्थानकात आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सावंतवाडीतील जगन्नाथ उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदिची घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच नाही. मंत्री केसरकर हे पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप  करुन यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले. 

केसकरांनी आपल्या आमदारकी तसेच मंत्रीपदाच्या काळात   बस स्थानकाचे भूमिपूजन केले. त्यावेळी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र अद्याप पर्यंत ते काम पूर्ण झालेले नाही. झालेले ५० टक्के काम चौकशी करण्यासारखे आहे. या सर्व प्रकारात ठेकेदाराचे लाड आणि जनतेचे हाल करताना केसरकर दिसत आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

ठेकेदारांवर कारवाई करू असे केसरकर सांगतात. मात्र अद्याप पर्यंत त्यांनी एकाही ठेकेदारावर कारवाई केली नाही. उलट ठेकेदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते त्यांना सुविधा देतात त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पहिल्यांदा येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करून दाखवावेत, अन्यथा ज्या-ज्या ठिकाणी विकास कामांचे आश्वासन दिली त्या-त्या ठिकाणी जाऊन आम्ही ठाकरे गटाचे पदाधिकारी आंदोलन करणार आहोत, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Shiv Sena Thackeray group's unique protest against minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.