शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष, तर येथील आमदारही शेमड्या, सावंतवाडीतून नारायण राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:18 PM2021-11-22T21:18:34+5:302021-11-22T21:19:08+5:30

Narayan Rane News: शिवसेना हा थापाड्याचा पक्ष आहे.आणि येथील आमदार ही शेमड्या आहे मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतात  मात्र हे तुमचे  पिल्लू काहीच करत नाही.

Shiv Sena is Thapadya's party, while MLAs from here are also attacking Narayan Rane from Shemdya, Sawantwadi | शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष, तर येथील आमदारही शेमड्या, सावंतवाडीतून नारायण राणेंचा हल्लाबोल

शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष, तर येथील आमदारही शेमड्या, सावंतवाडीतून नारायण राणेंचा हल्लाबोल

Next

सावंतवाडी - शिवसेना हा थापाड्याचा पक्ष आहे.आणि येथील आमदार ही शेमड्या आहे मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतात  मात्र हे तुमचे  पिल्लू काहीच करत नाही.येथील आमदारा पेक्षा गावचा सरपंच सरस असतो अशी टिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता केली.ते सोमवारी सावंतवाडीत आयोजित भाजप मेळाव्यात बोलत होते.याच्या पुढील सर्व निवडणूक भाजप कसे जिंकेल यावर भर द्या आपपसातील वाद मिटवा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,शैलेंद्र दळवी,संध्या तेरसे,अंकुश जाधव,पुकराज पुरोहित,शर्वनी गावकर,प्रमोद कामत,महेश सारंग,गुरुनाथ पेडणेकर,नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडीवरेकर,परिमल नाईक,दीपाली भालेकर,निकिता सावंत,मानसी धुरी,महेश धुरी,अजय गोंदावले,दिलीप भालेकर,प्रमोद गावडे,केतन आजगावकर,जावेद खतीब आदी उपस्थित होते.

राणे म्हणाले,सावंतवाडी मतदार संघावर माझे खुप प्रेम आहे.या मतदार संघासह कुडाळ व लोकसभेची जागा आमच्याकडे नाही,याची खंत वाटते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात या तीनही जागा भाजपकडे येण्यासाठी प्रयत्न करा भाजपला यश मिळण्यासाठी सर्वांनी कामाला लागा.आपापसात मतभेद नको. काही झाले तरी,आम्हाला यश मिळाले पाहिजे. मी आता दिल्लीत आहे.त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा असा तुमच्याकडून मला शब्द पाहिजे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी करा.प्रामाणिकपणे काम करा, कोणावर अन्याय होणार नाही,याची जबाबदारी मी घेतो.

तुम्ही काय ते मागा मी देईन पण आपल्यात भांडणे लावून त्याचा फायदा विरोधकांना होणार नाही. यासाठी काळजी घ्या,येणाऱ्या काळात शिवसेना व राष्ट्रवादीला विरोध करून त्यांना पाडा असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, मी मंत्री असताना सभागृहात  प्रत्येक जण अदबीने मला विचारत होता.मात्र आताच्या आमदाराला कोण विचारत नाही. मी कुठे आणि आताचे पिल्लू कुठे असे सांगून त्यांनी आमदार दीपक केसरकर यांना चिमटा काढला.

तेली म्हणाले,या ठिकाणी दोन हजार कोटीचा प्रकल्प म्हणून असे सांगून आमदार केसरकर लोकांची दिशाभूल करत आहे. यापूर्वी त्यांनी चष्म्याचा कारखाना सेट-टॉप-बॉक्स असे अनेक उपक्रम राबवू,असे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या,असे सांगितले.या बैठकीचे प्रस्तावित दादू कविटकर यांनी केले.
 
मुख्यमंत्र्यांना साॅप्ट काॅर्नर आजारी असल्याने बोलणार नाही
आपल्या भाषणात मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना साॅप्ट काॅर्नर देत मी त्याच्यावर काहि बोलणार नाही ते आजारी आहेत असे सांगत त्याच्या सर्व निर्णयावर मात्र जोरदार टिका सुशांतसिग रजपूत आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा ही राणे यांनी केला आहे.

Web Title: Shiv Sena is Thapadya's party, while MLAs from here are also attacking Narayan Rane from Shemdya, Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.