शिवसेनेकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न : जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:40 PM2021-03-22T17:40:42+5:302021-03-22T17:44:29+5:30

zp bjp devgad sindhudurg- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे देवगड तालुक्यातील भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांना रात्री-अपरात्री भेटून दमदाटी करीत आहेत. तसेच आर्थिक आमिषे दाखवित आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केला आहे.

Shiv Sena's attempt to force: A hint to answer as it is | शिवसेनेकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न : जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

शिवसेनेकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न : जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

Next
ठळक मुद्देशिवसेनेकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न संतोष किंजवडेकर यांचा आरोप, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

देवगड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे देवगड तालुक्यातील भाजपाच्याजिल्हा परिषद सदस्यांना रात्री-अपरात्री भेटून दमदाटी करीत आहेत. तसेच आर्थिक आमिषे दाखवित आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केला आहे.

भाजपाच्या प्रामाणिक जिल्हा परिषद सदस्यांना अशाप्रकारे आमिषे दाखवून, दमदाटी करण्याचा प्रकार यापुढे घडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. देवगड भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संतोष किंजवडेकर बोलत होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुका सरचिटणीस शरद ठुकरूल, शैलेश जाधव आदी उपस्थित होते.

संतोष किंजवडेकर म्हणाले, एकीकडे प्रसार माध्यमांवर सचिन वाझे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे आघाडी सरकारची पुरती नाचक्की झालेली असतानाच दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतेमंडळी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपा जिल्हा परिषद सदस्यांना आमिष दाखवून धमकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

परंतु, शिवसेनावाल्यांनी समजून जावे की भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अशा आमिषाला बळी पडणार नाहीत. शिवसेनेच्या या प्रयत्नांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही. भाजपचे प्रामाणिक पदाधिकारी शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळून लावतील. अशाप्रकारे भाजपच्या लोकप्रतिनिधींना शिवसेनेकडून धमकाविण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच ठिकाणी येऊन जशास तसे उत्तर दिले जाईल,असा इशाराही संतोष किंजवडेकर यांनी दिला आहे.

सेनेची सत्ता आणण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींच्या शेवटच्या टर्ममधील निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेचे बडे नेते विशेष करून सतीश सावंत हे रात्रीची भ्रमंती करीत आहेत. तसेच भाजपाच्या देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे किंजवडेकर म्हणाले.

Web Title: Shiv Sena's attempt to force: A hint to answer as it is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.