सिंधुदुर्ग : वैभववाडीत शिवसेनेची बैठक; प्रदीप बोरकर यांनी घेतला लोकसभा तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:55 PM2019-01-12T14:55:39+5:302019-01-12T14:57:36+5:30
शिवसेना पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली.
वैभववाडी : शिवसेना पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा संघटक निलमताई सावंत(पालव), उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, विलास साळसकर, शंकर पार्सेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष हर्षद गावडे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला जिल्हा उपसंघटक तेजल लिंग्रस, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी झिमाळ, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, युवासेना तालुकाप्रमुख जितेंद्र्र शिंदे, उपतालुकाप्रमुख दिलीप नारकर, अनिल नराम, विभाग प्रमुख बाबा खाडये, विठोजी पाटील, सुनील पवार, अतुल सरवटे, राजेश तावडे, जयराज हरयाण, दीपक पाचकुडे तसेच शाखाप्रमुख, बुथप्रमुख इत्यादी शिवसेनेचे अणि युवासेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
विभागप्रमुख, शाखाप्रमुख, तालुक्यातील ह्यबीएलओह्ण नेमणुकांची नेमकी स्थिती याबाबत माहीती घेत आपल्या विभागात आणि गावात अधिक सक्षमपणे काम करण्याच्या सूचना बोरकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील झालेली विकासकामे जनतेसमोर ठेवून येत्या निवडणुकीत जोमाने काम करुन पुन्हा भगवा फडकवूया, असे आवाहन नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले.