कोकणातील शिवसेनेचे वलय कृत्रिम : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:54 AM2021-01-14T11:54:40+5:302021-01-14T11:54:40+5:30

Ashish Shelar Bjp Sawantwadi Sindhudurg- कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे. त्यांनी नुसती वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे, अन्यथा त्यांना येथील जनता आगामी निवडणुकीत जमिनीवर आणेल, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

Shiv Sena's ring in Konkan is artificial: Ashish Shelar | कोकणातील शिवसेनेचे वलय कृत्रिम : आशिष शेलार

कोकणातील शिवसेनेचे वलय कृत्रिम : आशिष शेलार

Next
ठळक मुद्देकोकणातील शिवसेनेचे वलय कृत्रिम : आशिष शेलार

सावंतवाडी : कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे. त्यांनी नुसती वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे, अन्यथा त्यांना येथील जनता आगामी निवडणुकीत जमिनीवर आणेल, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत केलेली कपात हा असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला निर्णय असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

भाजप नेते आशिष शेलार हे सावंतवाडीत आले असता येथील नगरपालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, ॲड. परिमल नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, दिलीप भालेकर, महेश पांचाळ, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही, हे सत्य आहे. त्यामुळे माझ्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यासदौरा करून त्यातून धडा घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवरच सक्षम असल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारे व्यापक दृष्टीने काम करण्याचा प्रश्न नाही.

शिवसेनेने आगीशी खेळू नये

राज्याचे नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत वर्गीकरण रद्द करायचे आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना वर्गीकरण द्यायचे असा अपव्यवहार राज्यात कधीच घडला नव्हता. मात्र, राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असून त्यांनी आगीशी खेळू नये. आगीशी खेळल्यावर काय होते याची अनुभूती त्यांनी घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

 

Web Title: Shiv Sena's ring in Konkan is artificial: Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.