सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:47 PM2021-02-19T19:47:05+5:302021-02-19T19:51:23+5:30

Shivjayanti Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.

Shiva Jayanti celebration at Sindhudurganagari | सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्‍हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ,जिल्हा क्रीडा अधिकारी विजय स. शिदे, आदीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

विधान भवनात अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष  श्री.नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सकाळपासूनच विधान भवनाचा परिसर तुतारी-सनई चौघडयाच्या  निनादाने  दुमदुमून  गेला  होता.  पारंपारिक  वेषातील  तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळयाचे आकर्षण ठरले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव श्री.राजेंद्र भागवत, विशेष कार्य अधिकारी श्री. अनिल महाजन, सभापती, विधानपरिषद यांचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव श्री.रविंद्र जगदाळे, संचालक,वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र,म.वि.स. (अतिरिक्त कार्यभार) श्री. निलेश मदाने व महाराष्ट्र विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी, श्री.महेश चिमटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

 

Web Title: Shiva Jayanti celebration at Sindhudurganagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.