"नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा", पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 07:55 PM2023-12-04T19:55:43+5:302023-12-04T19:57:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत.

Shivarai's royal seal on Navy uniform two big announcements from Pm narendra modi | "नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा", पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा

"नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा", पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा

सिंधुदुर्ग- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. आज नौदल दिनानिमित्त पीएम मोदी यांच्याहस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. 

Sindhudurg: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, समुद्री सामर्थ्य किती महत्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. छत्रपती शिवाजी यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय नौदलाच्या सदस्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

मोदींनी दोन मोठ्या घोषणा केल्या

पीएम मोदी म्हणाले, भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणा पीएम मोदींनी यावेळी केली.

Web Title: Shivarai's royal seal on Navy uniform two big announcements from Pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.