शिवचेतना रॅलीने शहर दुमदुमले

By Admin | Published: February 19, 2017 11:19 PM2017-02-19T23:19:18+5:302017-02-19T23:19:18+5:30

स्वराज्य संघटनेच्यावतीने आयोजन : सावंतवाडीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Shivchatna Rally is a city full of rallies | शिवचेतना रॅलीने शहर दुमदुमले

शिवचेतना रॅलीने शहर दुमदुमले

googlenewsNext



सावंतवाडी : छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आणि भगवेमय वातावरणाने शिवजयंतीनिमित्त सावंतवाडीतील स्वराज्य संघटनेने आयोजित केलेल्या शिवचेतना रॅलीने सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. या रॅलीत अबालवृध्दांसह महिला भगिनींनीही सहभाग दर्शविला. घोड्यांसह ढोलताशांच्या गजरात येथील राजवाड्यातून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. गवळीतिठा शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
सावंतवाडीतील स्वराज्य संघटनेच्यावतीने यावर्षीही शिवप्रेमी व नागरिकांच्या पुढाकाराने शिवजयंतीनिमित्त शिवचेतना रॅलीचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी १० वाजता राजवाड्यातून या रॅलीला शुभारंभ करण्यात आला. युवराज लखम खेमसावंत भोसले यांच्या हस्ते शिवचेतना रॅलीची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर खासकीलवाडा शाळा नं. ४ नजीक शिवपुतळ्याला युवराज लखम खेमसावंत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे मार्गस्थ झाली. कॉटेल हॉस्पिटलमागील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तेथून जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोरून हॉटेल मँगो २, सालईवाडा, मुख्य बाजारपेठ, गांधी चौक याठिकाणी रॅली पोहोचली. यावेळी गांधी चौकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. सुरूवातीपासून उत्साह निर्माण झालेल्या रॅलीतील तरूणांनी शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू केला. ‘जय शिवाजी, जय भवानी, बघतोस काय मुजरा कर’ आदी घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला. भगवे फेटे, घोड्यांसह ढोलपथक व कौशल्य गवस या बालकाने साकारलेले बालशिवाजी हे या रॅलीतील आकर्षण ठरले. रॅली ज्या मार्गाने जात होती, त्या मार्गावर रांगोळी घातली होती. रॅलीत उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, स्वराज्य संघटनेचे सोमनाथ गावडे, राजू कासकर, श्रीपाद सावंत, सुनील पेडणेकर, सीताराम गावडे, राजू शेटकर, दिलीप भालेकर, प्रशांत मोरजकर, संजू शिरोडकर, सचिन मोरजकर, अमोल साटेलकर, अतुल केसरकर, प्रमोद तावडे, संदीप धुरी, अंकित तेंडुलकर, आनंद रासम यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते. या चेतना रॅलीची सांगता गवळी तिठा येथे भगवा ध्वज उभारून करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवचेतना रॅलीला शुभेच्छा दिल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Shivchatna Rally is a city full of rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.