सिंधुदुर्गात तिकीटवाटपावरुन शिवसैनिकांचा गोंधळ
By admin | Published: February 4, 2017 12:22 PM2017-02-04T12:22:05+5:302017-02-04T12:22:05+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीटवाटपावरुन शिवसेनेमध्ये सध्या घमासान सुरू आहे. उमेदवारी मिळालेल्या आणि नाकारण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तू-तू-मै-मै सुरू आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 4 - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीटवाटपावरुन शिवसेनेमध्ये सध्या घमासान सुरू आहे. उमेदवारी मिळालेल्या आणि नाकारण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तू-तू-मै-मै सुरू आहे. तिकीट
मिळवण्यासाठी इच्छुकांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयात गर्दी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यात पुन्हा एकदा बैठक होणार आहे. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी
आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली तर दुसऱ्या टप्प्यात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील मतदान 16 फेब्रुवारी, तर दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होईल