आचरा येथे त्या दुकानदारांनी मोडला नियम : पोलिसांकडून समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 04:19 PM2020-04-17T16:19:36+5:302020-04-17T16:21:59+5:30
आचरा : देशभरात लॉकडाऊन वाढल्याच्या आदेशानंतरसुद्धा आचरा परिसरात जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सोडून इतर दुकाने काही व्यापाऱ्यांनी चालू ठेवली ...
आचरा : देशभरात लॉकडाऊन वाढल्याच्या आदेशानंतरसुद्धा आचरा परिसरात जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सोडून इतर दुकाने काही व्यापाऱ्यांनी चालू ठेवली होती. यामुळे आचरा तिठा ते बाजारपेठ परिसरात दिवसागणिक नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आचरा पोलिसांच्या हे निदर्शनास आणून देताच पोलिसांनी जीवनावश्यक सेवेत न मोडणाºया दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगून पुन्हा दुकाने चालू ठेवलेली आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये न मोडणा-या काही व्यापाºयांनी आपली दुकाने लॉकडाऊन कालावधी वाढल्यानंतर चालू केल्याचे दिसत होते. याला माजी बांधकाम सभापती व आचरा व्यापारी जेरोन फर्नांडिस यांनी आक्षेप घेत आचरा पोलीस व आचरा सरपंच प्रणया टेमकर यांचे लक्ष वेधले होते.
गुरुवारी सकाळी १० वाजता आचरा तिठा येथे आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना जेरॉन फर्नांडिस यांनी जीवनावश्यक सेवा देण्याव्यतिरिक्त इतर दुकाने उघडी असल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी सरपंच प्रणया टेमकर, आचरा दक्षता समिती सदस्य मंगेश टेमकर, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत, पत्रकार, व्यापारी उपस्थित होते.
यावेळी जयदीप कळेकर यांनी नियम मोडणाºया व्यापाºयांना आज समज देतो व उद्या जे नियम मोडून दुकाने उघडी ठेवतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक कळेकर यांनी आचरा तिठा ते बाजारपेठमधील प्रत्येक दुकानाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. नियम मोडून चालू केलेली दुकाने बंद करण्यास त्यांनी सांगितले. शुक्रवारी जीवनावश्यक सेवा देणाºया दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने चालू केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
आचरा तिठा येथे नियम मोडणाºयांवरच्या कारवाईबाबत आचरा पोलीस सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी सरपंच प्रणया टेमकर, जेरॉन फर्नांडिस व इतर समिती सदस्यांनी चर्चा केली.